निपाणी तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री म्हणून ओळख असलेले ज्योतिष कुमार शंकर स्वामी यांना ज्योतिष भास्कर पंडित ही पदवी देऊन गौरविण्यात आले. ज्ञानगंगा ज्योतिष फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमरनाथ स्वामी यांनी ही पदवी कुमार स्वामी यांना बहाल केली.कुमार स्वामी हे गेल्या दहा वर्षांपासून निपाणी तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ज्योतिष शास्त्री म्हणून काम करत आहेत. आपल्या विद्येच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा सल्ला घेण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून लोक त्यांच्याकडे येत असतात. लग्न वास्तुशांती यासह कोणत्याही शुभ कार्याला त्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या ज्योतिष शास्त्र व सामाजिक योगदानाची दखल घेताना ज्योतिष भास्कर पंडित ही पदवी देऊन गौरविण्यात आले.
कुमार स्वामी हे गेल्या दहा वर्षांपासून निपाणी तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ज्योतिष शास्त्री म्हणून काम करत आहेत. आपल्या विद्येच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा सल्ला घेण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून लोक त्यांच्याकडे येत असतात. लग्न वास्तुशांती यासह कोणत्याही शुभ कार्याला त्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या ज्योतिष शास्त्र व सामाजिक योगदानाची दखल घेताना ज्योतिष भास्कर पंडित ही पदवी देऊन गौरविण्यात आले.
कुमार स्वामी हे मूळचे श्रीपवाडीचे असले तरी ते यमगर्णी येथे ज्ञानगंगा ज्योतिष फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. हस्तशास्त्र, कुंडली अंकशास्त्र यामध्ये त्यांचे विशेष असे प्राविण्य आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक लोकांना संकट मुक्त केले आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात काम करता करता सामाजिक कार्याचे भान ठेवून समाजसेवा केली आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सर्वाधिक लहान वयात त्यांना ज्योतिष भास्कर पंडित ही पदवी बहाल करण्यात आली. यापूर्वी ज्योतिषाचार्य म्हणूनही त्यांचा गौरव झाला आहे.