
जेडीएस चे उमेदवार नाशीर बागवान हे पक्षाच्या जुन्या नेते मंडळीना विश्वासात घेत नसल्याची तक्रार जेडीएस चे नेते व माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांच्याकडे केली असल्याची माहिती जेडीएस चे जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ वकील श्री एच एन देसाई यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली, यावेळी जेडीएस चे नेते रेवनसिद्घय्या हिरेमठ, फारूक नाईक, महिला जिल्हा अध्यक्षा मेघा कुंदरगी, शीवा बागेवाडकर, यांनी सुध्दा आपले विचार मांडले,
खानापूर जेडीएस चे उमेदवार नाशीर बागवान हे पक्षाच्या जुन्या जानत्या व जेष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता मनाला येईल तसे निर्णय घेत आहेत आम्ही 20 ते 25 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ रहावुन कार्य केलेल्या लोकांना ते आज कीमत देत नाहीत, त्यांना उमेदवारी मिळाली म्हणून आम्ही अजीबात नाराज नाही सद्यस्थितीत खानापूर तालुक्यात जेडीएस चा उमेदवार निवडून येण्यासाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे, त्यासाठी त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन जर तालूक्यात जेडीएस चा प्रचार केल्यास ते नक्कीच निवडून येतील, याबाबत आज सकाळी जेडीएस चे नेते माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांच्याशी आमचे फोनवरून बोलने झाले असुन त्यांनी आम्हाला पक्षात रहावुन काम करण्याची विनंती केली असल्याने आम्ही पक्षा सोबतच रहावुन कार्य करणार असल्याचे सांगितले,
यावेळी अजीत पाटील, रघुनाथ देसाई, व पत्रकार मंडळी उपस्थित होती,
यावेळी पुढे माहीती देताना त्यांनी सांगितले की रफिक वारीमनी, शंकर सोनोळी, आलिम नाईक, रियाज बस्तवाडकर, बसवप्रभू हिरेमठ, रघुनाथ देसाई, राजू खातेदार, नसरीन बानू तिकडी यांनी सुध्दा आमच्या सोबत असल्याचे सांगितले,
