
खानापूर : प्रती वर्षाप्रमाणे इस्कॉन रथ यात्रा महोत्सव या वर्षी सुध्दा आयोजित करण्यात आला असून भजन, कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3-30 वा बसवेश्वर सर्कल (जांबोटी क्रॉस) येथुन सुरू होवुन शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून श्री मलप्रभा नदी घाट जगन्नाथ मंदिर येथे सायंकाळी 6-30 वा पोहचेल त्यानंतर 6-30 ते रात्री 10-00 पर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यलिला, व कृष्ण प्रसाद, होणार आहे, तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे,
