हुक्केरी डीसीसी बँक निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती.
बेळगाव : उद्या रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या हुक्केरी संचालकपदाच्या निवडणुकीवर उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे नियोजित सात पैकी एका हुक्केरी क्षेत्रातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
हुक्केरी तालुक्यातील प्राथमिक सहकारी कृषी संस्थांमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या संचालकपदाच्या निवडणुकीस स्थगिती देण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील निवडणूक पुढील न्यायालयीन आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या जागेवर रमेश कत्ती निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीने लागून राहिले होते.
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे नियोजन तात्पुरते थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने पुढील सुनावणीदरम्यान स्पष्ट आदेश देईपर्यंत हुक्केरी क्षेत्रातील मतदान प्रक्रिया होणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
या निर्णयामुळे डीसीसी बँकेच्या निवडणुकीत स्पर्धेत असलेल्या रमेश कत्ती व इतर उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.
ಸಾಹುಕಾರ್ ಗೆ ಶಾಕ್ ; ಡಿಸಿಸಿ ಚುನಾವಣೆ ಮುಂದೂಡಿದ ಕೋರ್ಟ್..!
ಬೆಳಗಾವಿ : ಅಕ್ಟೋಬರ್ 19 ರಂದು ನಡೆಯಲಿರುವ ಏಳು ಕ್ಷೇತ್ರಗಳ ನಿರ್ದೇಶಕ ಸ್ಥಾನದ ಚುನಾವಣೆಗೆ ಸಧ್ಯ ವಿಘ್ನ ಎದುರಾಗುದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ಚುನಾವಣೆ ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ.
ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರಾಥಮಿಕ ಸಹಕಾರಿ ಕೃಷಿ ಸಂಘಗಳಿಂದ ಪ್ರತಿನಿಧಿಸುವ ನಿರ್ದೇಶಕ ಸ್ಥಾನದ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಮುಂದೂಡುವಂತೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ
ನೀಡಿರುವ ಹಿನ್ನಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದವರೆಗೆ ಚುನಾವಣೆ ಮುಂದೂಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ದೊರೆಯಬೇಕು.

