
श्री दत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठाचे पीठाधिश्वर पद्मश्री विभूषित धर्मभूषण “सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी” महाराजांच्या आशीर्वादाने “- संत समाज खानापूर झोन- “आणि “- सद्गुरु होमिओकेअर -” यांच्या संयुक्त आयोजनाने “- गव्हर्मेंट फर्स्ट डिग्री कॉलेज खानापूर”- येथे “पीसीओडी आणि वुमन्स हेल्थ विथ होमिओपॅथी” या विषयावर डॉ गौरेश भालकेकर यांचे आरोग्य विषयक व्याख्यान सुसंपन्न झाले.

पिझ्झा,बर्गर,पेस्ट्रीज खाणे हे तरुणींच्या आयुष्यातील एक घटक बनले आहेत, अशा अन्नपदार्थांच्या सेवनामुळे लठ्ठपणा सारख्या समस्या चे प्रमाण वाढत चालले आहे आणि यामुळेच तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे.तरूणीनी वेळीच या आजाराची दक्षता घ्यावी अन्यथा वंध्यत्व, डायबिटीस ,हायपर टेन्शन,मानसिक तणाव ई. त्रासिक समस्यांना सामोरे जावे लागते असे प्रतिपादन डॉ.गौरेश भालकेकर यांनी केले.
योगाचार्य श्री वैजू गुरव यानी वैदिक सनातन संस्कृती आणि ध्यानसाधना याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले .
समाजाप्रती असलेले योगदान पाहून प्राचार्य डॉ.दिलीप जवळकर सर यांनी डॉ. गौरेश भालकेकर आणि श्री.वैजू गुरव यांचा सत्कार केला.

व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप जवळकर सहित डॉ. सोनल ( बीबीए विभाग प्रमुख, कोऑर्डिनेटर फॉर रेड क्रॉस अँड वूमन सेल ).डॉ.भाग्यश्री पट्टणशेट्टी, उद्योजक श्री.निवृत्ती पाटील, योगाचार्य श्री.वैजू गुरव उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.दिलीप जवळकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि प्रो.डॉ. सोनल रेवणकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थी उपस्थित होत्या.
