
हिंडलगा (ता. बेळगाव) येथील ग्रामपंचायतला राज्य शासनाकडून गांधीग्राम पुरस्कार देण्यात आला, सदर पुरस्कार नुकताच बेंगलोर येथील एका कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्यानी स्वीकारला. यावेळी हिंडलगा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मनोळकर, उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य एन एस पाटील, हिंडलगा ग्रामपंचायत सेक्रेटरी सुखदेव कोलकार, दुर्गाप्पा कांबळे ग्रामपंचायत क्लार्क संतोष नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम उत्कृष्टपणे राबवून ग्रां पं क्षेत्रातील परिसर कायम स्वच्छ ठेवून स्वच्छता अभियान उपक्रम प्रभावपणे राबवीला त्यामुळे हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याबाबत ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर म्हणाले या पुढील काळातही हिंडलगा ग्रां पं परिसरात स्वच्छता मोहीम गतिमान राहील आणि याला छेद देणाऱ्या वर कारवाई करण्यात येईल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वच नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करून आपला परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे,
