
खानापूर पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हत्तरगुंजी दादोबा नगर डुक्करवाडी मुडेवाडी, कलमेश्वर नगर, गुरव गल्ली घाडी गल्ली व इतर गावच्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना नवीन बांधण्यात आलेल्या महामार्गावर भुयारी मार्गाची मागणी प्रलंबित असताना अचानक (डिव्हायडर) दुभाजक घालण्यात येत असल्याने सदर गावच्या नागरिकांनी विद्यार्थ्यासह रास्ता रोको केला होता त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल जेष्ठ नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी त्यांची भेट घेऊन सदर समस्येचे ताबडतोब निवारण करतो असे आश्वासन देऊन त्यांना रस्ता रोको मागे घेण्यास सांगितले होते

म्हणून त्यासंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी या भागातील नागरिकासह धारवाड येथील महामार्ग प्रोजेक्ट डायरेक्टर श्री भुवनेश के आर यांची भेट घेतली व प्रलंबित असलेला भुयारी मार्ग लवकरात लवकर करून देण्याची मागणी केली त्यांना निवेदन सादर केले तसेच होणकल ते राजवळ गावापर्यंत च्या काही जमिनी गेलेल्या काही शेतकऱ्यांचे सरकारकडून पैसे येणे बाकी आहेत ते लवकरात लवकर देण्यात यावेत तसेच थ्रीडी मध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याबद्दल टाळाटाळ करण्यात येत आहे याबद्दलची तक्रार ही प्रोजेक्ट डायरेक्टरांच्या निदर्शनाला आणून देण्यात आली तसेच हत्तरगुंजी ते खेमेवाडी पर्यंतचा सर्विस रोड तसेच हलकर्णी अंडर ब्रिज पासून रेल्वे पुलापर्यंतचा सर्व्हिस रोड करून देण्याबद्दल चर्चा करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, यावेळी प्रमोद कोचेरी यांच्याबरोबर ग्रां पं माजी सदस्य शाहू अगणोजी, प्रवीण पाटील व आदि उपस्थित होते,
