खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील ज्ञानेश्वर मंदिर च्या खालच्या बाजूला विजेचा विद्युत पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारा विजेचा खांब गेल्या बऱ्याच दिवसापासून रस्त्याच्या मधोमध एक बाजूला कलला असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्या ठिकाणाहून जाणाऱ्या येणार्या चार चाकी गाड्यांना तो खांब घासत असून केव्हाही कधीही अपघात होऊन खाली पडून दुर्घटना कींवा जीवित हानी होऊ शकते व असे होवू नयेत म्हणून या गल्लीतील नागरिकांनी 23 ऑगस्ट 2022 रोजी हेस्कॉमला निवेदन दिले असता त्याची दखल घेऊन थोड्या दिवसात त्या ठिकाणी नवीन खांब घालण्यासाठी आणूनही ठेवण्यात आला पण माशी कुठे शींकली माहित नाही चार महिने झाले तरीही जुना खांब काढून नवीन बसविण्यात आला नाही म्हणून या गल्लीतील नागरिकांनी हेस्कॉमच्या नावाने संताप व्यक्त केला आहे,
या धोकादायक खांबापासून दोन घरे सोडून खानापूर हेस्कॉमच्या AEE असिस्टंट ईक्झीकेटिव्ह ईंजीनीयर कल्पना तीरवीर यांचे घर असून त्या गल्लीतीलच रहिवासी आहेत याबाबत संपुर्ण माहिती त्यांना असून गल्लीतील नागरिकांनी वरचेवर त्यांच्या कानावर हि गोष्ट घातली असून असे असताना त्यांनी सुध्दा या गोष्टीकडे का दुर्लक्ष केले आहे हे समजत नाही असे नागरिकांनी “आपलं खानापूर” शी बोलताना सांगितले आहे,
सदर वीजेचा खांब एक बाजूला कलल्याने खांब्याचा वरचा भाग रस्त्याच्या मध्यभागी आला असून त्या ठिकाणाहून गाड्या चालविण्यास सुध्दा अडचण येत असून केव्हाही कुठली गाडी खांब्याला धडकेल व अप्रिय दुर्घटना होवू शकेल हे सांगता येत नाही व असे काही बरे वाईट घडल्यास हेस्कॉमचे अधिकारी जबाबदार रहातील, तरी कृपया हेस्कॉमने पुढील होणारा अनर्थ टाळण्यासाठी याकडे ताबडतोब लक्ष देवून सदर धोकादायक खांब हटवून त्याठिकाणी नवीन खांब बसवावा व पुढील होणारा अनर्थ टाळावात अशी या गल्लीतील नागरिकांची मागणी आहे,
तसेच 23 ऑगस्ट 2022 रोजी हॅस्कॉम ला दिलेल्या तक्रार अर्जावर या गल्लीतील नागरिक शांताराम उपस्कर, अरुण सत्तेगिरी, सुभाष सत्तेगिरी, दिलीप पाटील, कृष्णा सुतार, संभाजी पाटील, बाळू पेटकर, प्रकाश तेंडुलकर, गजानन उपस्कर, प्रल्हाद हुबळीकर, मंजुनाथ कासार, या नागरिकांच्या सह्या असून अजूनही या अर्जाची दखल हेस्कॉमच्या अधिकार्यांनी का घेतली नाही हा एक चर्चेचा विषय आहे, आणि मुख्य म्हणजे वीचार करण्यासारखी गोष्ट हि आहे की हेस्कॉमच्या AEE मुख्य अधिकारी या गल्लीतीलच रहिवासी आहेत,