खानापूर तालुक्यातील घोटगाळी गावचे खेमराज गडकरी आणि त्यांचे मित्र गणपती अष्टेकर रात्री 2:45 वाजता अदमापूर बाळूमामा चे दर्शन घेऊन मोटारसायकल वरून गावी जात होते. त्याच वेळी विशाल कत्तीशेट्टी ( टाटा एस, ) रामनगर हुन नंदगड ला जात होते,
कौंदल येथील Hescom च्या विद्युत पुरवठा डीपीत जळल्याचा प्रकार लक्षात आला, आणि रस्त्यावरील विद्युत तार खाली आली, दैव बलवत्तर म्ह्णून त्यांचे लक्ष डीपी कडे गेले, आणि रोड पासून अवघ्या 5 फुटावर झुलणाऱ्या तारेला पाहून वाहनांची गती कमी केली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
प्रसंगी विशाल आणि इतर वाहन चालकांनी मागून आणि समोरून येणाऱ्या वाहनांना थांबवून रोड वरील दळणवळण थांबवली व खेमराज गडकरी यांनी संबंधित hescom अधिकारी आणि कर्मचारी ना मोबाईल व्दारे संपर्क करून घटनेची सूचना दिली.
प्रसंगी माहिती मिळताच hescom कर्मचारी श्री भरमानी गुरव यांनी घटनास्थळी येऊन तत्परतेने उच्च अधिकारी यांना या घटनेची माहिती देऊन तात्काळ संबंधित विभागाचा विद्युत पुरवठा बंद करून स्वतः धोकादायक विद्युत तार हटवून मार्ग मोकळा करून दिला.
भरमानी गुरव यांनी ताबडतोब घटनास्थळी हजर राहून अत्यंत कमी वेळात आपले योग्य कर्तव्य जागरूक पणे पार पाडल्याबद्दल खेमराज गडकरी आणि जमलेल्या वाहन चालकांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले.
या विद्युत वाहक मधून चापगांव, नंदगड सह इतर भागात विद्युत पुरवठा केला जातो पण रस्ता ओलांडलेल्या तारां खाली सुरक्षित जाळी बसवली गेली नाही,
तार जर झुलती (टांगती) राहिली नसती तर काय झाले असते याची कल्पना पण करता आली नसती.