
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एच३एन२ व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते.
हा रुग्ण ७३ वर्षांचा होता. त्याला एच३एन२ व्हायरसची लागण झाल्यामुळे त्याच्यावर ८ मार्चपासून वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या रुग्णाला अन्य व्याधीही होत्या. आज सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच निष्काळजीपणेही वागू नये. ताप, सर्दी, खोकला असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी ्जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एका तातडीच्या बैठकीत एच३एन२चा आढावा घेणार आहेत. त्यानंतर मास्कसक्तीबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.
