
खानापूर तालुक्यातील गुंजी ग्रामपंचायत येणाऱ्या भालके बी के वार्ड नंबर सात मध्ये अर्धवट स्थितीत असलेल्या काम पूर्ण झाले म्हणून खोटे बिल काढल्याने भालके नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे या कामाची वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून काम करण्या अगोदरच बिल काढलेल्या पंचायत अधिकाऱ्यावर व यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर योग्य तो कर्म घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना देण्यात आले.
भालके बिके मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 2018 मध्ये रोजगार हमी योजनेतून विहीर खोदण्यात आली होती या विहिरीचे पाणी गावामध्ये आणण्यासाठी गुंजी ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून विद्युत खांब घालण्यासाठी एक लाख 35 हजार रुपयाची तरतूद केली होती मात्र सदर काम केवळ या ठिकाणी चार खांब उभे करून बंद करण्यात आले होते एक वर्षापूर्वी चारा विना खांब उभारून सदर कामाचे बिल एक लाख 22 हजार रुपये खर्च दाखवून काढण्यात आल्याचे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांना समजल्याने ग्रामस्थात एकच खळबळ उडाली आहे काम पूर्ण न होता बिल कसे काढण्यात आले असा जबाब जाब विचारल्यानंतर व्हिडिओ मी सदर काम चार दिवसात पूर्ण करून देतो असे तोंडी आश्वासन दिले होते पण पंधरा दिवस उलटून गेले तरी अध्यापत्ते काम न झाल्याने भालके ग्रामस्थांनी व गुंजी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष सुभाष घाडी यांनी सदर कामाबद्दल तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन आपली तक्रार नोंदविली आहे याची दखल ताबडतोब घेतली नाही तर ग्रामस्थासह जिल्हा परिषद व जिल्हा परिषद मुख्य सचिवापर्यंत तक्रार करणार असल्याचे सुभाष घाडी यांनी सांगितले आहे सदर निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत,
पंचायत व्याप्तीत व तालूक्यात खळबळ उडाली आहे
अर्धवट कामाचे बिल काढण्याची माहिती खानापूर तालुक्यात व गुंजी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या गावात सर्व गावातील नागरिकांना समजल्याने एकच खळबळ उडाली आहे अशी अनेक कामे झाली असल्याची शंका त्या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत एकंदर काम अर्धवट असताना संपूर्ण बिल काढले कसे असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत
