गुंजी श्री माऊली देवी यात्रोत्सव 12 ऑक्टोबर पासून.
गुंजी (प्रतिनिधी संदीप खेमांन्ना घाडी) ; प्रतिवर्षाप्रमाणे विजयादशमी रोजी गुंजी येथे शनिवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 पासून, श्री माऊली देवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून. बुधवार दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 रोजी या यात्रेची सांगता होणार आहे.
या यात्रोत्सवात शनिवारी 12 तारखेला सकाळी 7.00 वाजता श्री माऊली देवीला अभिषेक होणार आहे. त्यानंतर 11.00 वाजता देवीचा शृंगार विधी होणार, त्यानंतर दुपारी 2.00 वा. श्री माऊली देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणुकीसह मंदिरास, पाच प्रदक्षिणा होणार. त्यानंतर बैलजोड्या फिरऊन संध्याकाळी मानकऱ्यांच्या ओट्या भरणे व इंगळ्या नहाने आणि रात्री ठीक 8.00 वाजता शेजारती व प्रसाद.
रविवार दिनांक 13 रोजी, सकाळी ठीक 8.00 वाजेपासून इंगळ्या नाहाने, देवीस ओटी भरणे, नवस फेडणे व तुळाभार आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार. दुपारी ठीक 12.00 वा. श्री माऊली देवी जनसेवा फाउंडेशन गुंजी यांच्या वतीने महाप्रसाद होणार आहे. व रात्री ठीक 8.00 वा. शेजारती व प्रसाद. तसेच नाट्यप्रेमींसाठी रात्री ठीक 10:00 वा. गुंजी सोशल फाउंडेशन गुंजी पुरस्कृत “राजकारणात रंगली ग्राम पंचायत” हा नाट्यप्रयोग होणार आहे.
सोमवार दि. 14 रोजी सकाळी ठीक 8:00 वाजेपासून इंगळ्या नाहाने, देवीस ओटी भरणे, नवस फेडणे, तुळाभार आणि इतर धार्मिक कार्यक्रम. रात्री ठीक 8:00 वा. शेजारती व प्रसाद.
मंगळवार दि. 15 रोजी सकाळी ठीक 8:00 वाजेपासून इंगळ्या नाहाने, देवीस ओटी भरणे, नवस फेडणे, तुळाभार आणि इतर धार्मिक कार्यक्रम. रात्री ठीक 8:00 वाजता शेजारती व प्रसाद.
बुधवार दिनांक 16 रोजी सकाळी ठीक 8:00 वाजेपासून इंगळ्या नाहाने, देवीस ओटी भरणे, नवस फेडणे, तुळाभार आणि इतर धार्मिक कार्यक्रम व दुपारी 2:00 वाजता, देवी भांडारण्याचे गाऱ्हाणे होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.
ಅಕ್ಟೋಬರ್ 12ರಿಂದ ಗುಂಜಿಯಲ್ಲಿ ಮೌಳಿದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗುಂಜಿಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಶ್ರೀಮೌಳಿ ದೇವಿಯ ಉತ್ಸವ ಯಾತ್ರೆಯು ಅಕ್ಟೋಬರ್ 12ರ ಶನಿವಾರದಿಂದ ಆರಂಭವಾಗಿ ಅಕ್ಟೋಬರ್ 16ರ ಬುಧವಾರದಂದು ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ.