
बेळगाव : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 9 ते 21 जून या कालावधीत तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असुन खानापूर तालुक्यात 19 जून रोजी सकाळी दहा वाजता आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकानुसार अथणी तालुक्यासाठी 9 जून रोजी सकाळी 10 वाजता
कागवाड तालुक्यासाठी 9 जून रोजी दुपारी ३ वाजता, रायबाग तालुक्यासाठी 12 जून रोजी सकाळी 10 वाजता, मुडलगी तालुक्यासाठी 12 जून रोजी दुपारी 3 वाजता, गोकाक तालुक्यासाठी 15 जून रोजी सकाळी 10 वाजता.
हुक्केरी तालुक्यासाठी 15 जून रोजी दुपारी 3 वाजता, बैलहोंगल तालुक्यासाठी 16 जून रोजी सकाळी 10 वाजता, सौदत्ती तालुक्यासाठी 16 जून रोजी दुपारी 3 वाजता, रामदुर्ग
तालुक्यासाठी 17 जून रोजी दुपारी 3 वाजता. खानापूर तालुक्यासाठी 19 जून रोजी सकाळी 10 वाजता, कित्तूर तालुक्यासाठी 19 जून रोजी दुपारी 3 वाजता.
बेळगाव तालुक्यासाठी 20 जून रोजी सकाळी 10 वाजता आणि निपाणी तालुक्यासाठी 21 जून रोजी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. या आरक्षणाकडे इच्छुकांचे डोळे लागुन राहिले आहे.
