वीज कोसळून झाडाखाली थांबलेल्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू! खनगांव बेळगाव येथील घटना!
बेळगाव ; बेळगाव तालुक्यातील खणगाव येथे वीज कोसळल्याने शेतातील झाडाखाली थांबलेल्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. अत्सा जमादार असे या दुर्दैवी मृत मुलीचे नाव आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अत्सा ही शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आईसोबत शेतात गेली होती. सायंकाळच्या वेळी अचानक विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसापासून बचावासाठी दोघी मायलेकी झाडाखाली उभ्या राहिल्या होत्या. मात्र दुर्दैवाने आत्सा हिच्यावर वीज कोसळल्याने आईच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू झाला. मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
ಮರದ ಕೆಳಗೆ ನಿಂತಿದ್ದಾಗ ಸಿಡಿಲು ಬಡಿದು 15 ವರ್ಷದ ಬಾಲಕಿ ಸಾವು! ಖಾನಗಾಂವ್ ಬೆಲ್ಗಾಂವ್ ನಲ್ಲಿ ಘಟನೆ!
ಬೆಳಗಾವಿ : ತಾಲೂಕಿನ ಖನಗಾವ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಹೊರಟ್ಟಿದ್ದ ಬಾಲಕಿಯೋರ್ವವಳಿಗೆ ಸಿಡಿಲು ಬಡೆದು ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಮೃತಪಟ್ಟ ಘಟನೆ ಬುಧವಾರ ನಡೆದಿದೆ.
ಅತ್ಸಾ ಜಮಾದಾರ (15) ಮೃತಪಟ್ಟ ಬಾಲಕಿ ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗಿದೆ. ಶಾಲೆ ರಜೆ ಇದ್ದ ಕಾರಣ ತಾಯಿಯೊಂದಿಗೆ ಜಮೀನು ಕೆಲಸಕ್ಕೆ ತೆರಳಿದ್ದ ಬಾಲಕಿ ಮಳೆ ಬರುತ್ತಿದ್ದಂತೆ ಜಮೀನಿನಿಂದ ಹೊರ ಬಂದು ಮರದ ಕೆಳಗಡೆ ನಿಂತಿದ್ದರು.



