खानापूर : खानापूर शहरात व तालुक्यातील काही भागात गांजा विक्रीच्या घटना सतत घडत असतात शुक्रवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 6-45 वाजता खानापूर शहरापासून जवळ असलेल्या रुमेवाडी क्रॉस जवळ मन्सूर आप्पालाल मकानदार व 39 राहणार पारीश्वाड ता खानापूर व रामचंद्र नागाप्पा शिंदे वय 63 राहणार लक्केबैल ता खानापूर यांच्याकडून अमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती खानापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय रामचंद्र नाईक व सब ईन्सपेक्टर प्रकाश राठोड यांना मीळताच
बैलहोंगल चे डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली चोरून गांजा विक्री करणाऱ्या संबंधितांना पकडून 1 किलो 105 ग्रॅम (1105 ग्रॅम) वजनाचा गांजा तसेच स्कुटी केए 22 एम एच 0912 दुचाकी जप्त करून त्यांच्यावर 61 / 2023 कलम 20 बी एन डी पी एस गुन्हा दाखल करून सदर आरोपींना न्यायालयात हजर केलकेले आहे याबाबत बेळगाव एस पी यांनी खानापूर पोलीस स्थानकाचे अभिनंदन केले आहे