श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टची बैठक श्रीराम मंदिर खानापूर येथे बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी सात वाजता कमिटीचे अध्यक्ष श्री आर पी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन गंगापूजन बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन व गोमाता पूजन करून गंगा मातेच्या कार्तिक महोत्सवला सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले,
तसेच यावर्षी श्री गंगा मातेची मूर्ती लाकडी बनविण्यात आली असून गंगापूजनाच्या अगोदर सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मूर्तिकार हनुमंत सुतार मारुती नगर यांच्या घरापासून मूर्तीचे वाजत गाजत सहवाद्य खानापूर शहरातून मिरवणूक काढून राम मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे त्यासाठी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी मुर्ती आणण्यात येणाऱ्या गुरव गल्ली, घाडी गल्ली, बाजारपेठ, केंचापूर गल्ली, बुरुड गल्ली, लक्ष्मी मंदिर, नींगापूर गल्ली, घोडे गल्ली मार्गे देसाई गल्ली, विठ्ठल देव मंदिर, अर्बन बँक चौकातून श्रीराम मंदिर येथील नागरिकांनी आपापल्या घरासमोर स्वच्छता करून सडा, रांगोळ्या घालून गंगा मातेचे स्वागत करावेत
अशी विनंती तेथील नागरीकांना करण्याचे ठरविण्यात आले, तसेच सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सर्वांनी मूर्ती आणण्यासाठी मारुती नगर येथे उपस्थित रहावेत तसेच बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिकांनी गंगा पूजन व कार्तिकोत्सवात सायंकाळी चार ते रात्री 10 पर्यंत भाग घेवुन दर्शन घेण्याची विनंती कमिटीतर्फे करण्यात आली आहे, यावेळी घाट कमिटीचे सेक्रेटरी वसंत देसाई, सभासद संजय कुबल, किरण यळूरकर, श्री श्रीकांत नाटेकर, माजी नगरसेवक दिनकर मरगाळे, नगरसेवक आप्पया कोडोळी, अजित सईल, मनोज रेवणकर, दिपक सखदेव, विठ्ठल हळदणकर, पुंडलीक खडपे, अमोल तिनईकर,अनुप तिनईकर, मूर्तिकार हनुमंत सुतार व आधी पदाधिकारी व कमिटीचे सभासद उपस्थित होते