
चीगुळे ता खानापूर येथे भाजपा तक्रार निवारण केंद्र आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने डॉ सोनाली सरनोबत यांनी चिगुले ग्रामस्थांसाठी आज बुधवार दि 12 आक्टोंबर रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते,
यावेळी झालेल्या समारंभाच्या व्यासपीठावर गणपत गावडे, अनंत गावडे, जयदेव चौगुले, सचिन पवार, लाडूताई (ग्रामपंचायत सदस्य), आनंद तुप्पद (नंदादीप हॉस्पिटल) यांच्यासह भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या, यावेळी डॉ.सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील भाजप तक्रार निवारण केंद्राविषयी माहिती सांगितली, सदर मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मे वितरण कार्यक्रम डॉ सरनोबत यांनी आयोजीत केला होता, या शिबिरात ९० महिलांनी लाभ घेतला होता.


