काल दि. २३ रोजी के के कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक झाली, कोणत्याही परिस्तिथीमध्ये आपली 1 इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.,स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला
आनि कोणत्याही परिस्तिथी मध्ये आपल्या शेतामध्ये रेल्वे किंव्हा kiadb अधिकारी ,कॉन्ट्रॅक्टर याना पाय ठेवायला देणार नाही अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली,2 इतर सर्वे केलेले असताना अंतर कमी होत असताना पहिल्या मार्गानेच ट्रॅक करा असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावून अंगडी कुटुंबीय वयक्तिक स्वार्थ साधत असल्याचे उघड दिसून येते पण कोणत्याही परिस्तिथी मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही असा विश्वास शेतकरी नेत्यांनी दिला, रिंगरोड मध्येही शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनि जात आहेत आणि दुसरीकडे रेल्वे असे करून शेतकऱ्याला देशोधडीला लावायचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावं असे शब्द दुःख टाकत शेतकरी मांडत आहेत.याफुडे जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर पहिला असो किंव्हा दुसरा असा कोणता रेलवे मार्गच होऊ देणार नाही असे मत प्रसाद पाटील यांनी मांडले आणि सर्वानुमते निर्णय घेण्यात आला .बैठकीला हुडप्पा नंदि अध्यक्षस्थानी होते, परशराम कोलकार, प्रसाद पाटील ,माजी महापौर शिवाजी सुंठकर,आर. आय पाटील,मनोज पावशे आर. एम. चौगुले यांची भाषणे झाली येत्या 28 तारीखला रिंगरोड आणि रेल्वे रोड विरोधात चाबूक मोरच्या मध्ये मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन उपस्तीत रहा कमीतकमी 25000 शेतकरी उपस्तीत रहाणार आहेत असे शिवाजी सुंठकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. चंद्रकांत कोंडुस्कर,रामदास जाधव,मारुती लोकूर, परशराम जाधव,मारुती राऊत,डुंडूने आणि k k कोप्प गावातील बहुसंख्य असे शेतकरी उपस्तीत होते..