अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी दिली जाणारी शैक्षणिक मदत वाटण्याचा कार्यक्रम यंदा नुकताच समर्थ सोसायटीच्या मारुती गल्ली येथील हॉलमध्ये संपन्न झाला. आजवर विद्यार्थ्यांना एक लाख रुपये पर्यंतची शैक्षणिक मदत देण्यात आली असल्याची माहिती विनायक जोशी यांनी दिली. याप्रसंगी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ बेळगावचे उपाध्यक्ष सुधीर जोशी ,कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी, कार्यवाह विनायक जोशी, खजिनदार अभय जोशी आणि समर्थ चे व्यवस्थापक अरविंद कुलकर्णी हे उपस्थित होते. सुहास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून संघाच्या कार्याची माहिती दिली. सुधीर जोशी यांनी आभार मानले.