आमचे बाबा, धाकलू लक्ष्मण गावडे आयुष्याचा आधारस्तंभ ; प्रकाश पाटील, अरुण पाटील, चंद्रकांत पाटील यांचे मनोगत.
झाडनावगे (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील रहिवासी व माजी सैनिक धाकलू लक्ष्मण गावडे (पाटील) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी गुरुवार दि. 23 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. आज त्यांच्या बाराव्या दिनी थोडक्यात.
थाकलू लक्ष्मण गावडे (पाटील) यांचा जन्म झाडनावगे, ता. खानापूर येथे दि. 7 मार्च 1944 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने आईनेच त्यांचे संगोपन केले. त्यांना तीन बहिणी आणि दोन भाऊ होते. ते कर्तव्यदक्ष, शांत आणि प्रेमाचे प्रतीक होते. त्यानी 15 वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावली आणि देशासाठी आपले योगदान दिले.
निवृत्तीनंतर त्यांनी वास्को, गोवा येथील गोवा शिपयार्ड कंपनीत काम केले आणि शेवटी गावी परतून शेतीत रमले. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि प्रगल्भ होते. त्यांच्या जीवनात साधेपणा आणि
आत्मविश्वास होता. जो प्रत्येक क्षणाला दिसून येत असे, ते नेहमीच मदतीसाठी पुढे असत. विशेषतः आपल्या शेजाऱ्यांना आर्थिक आणि इतर सर्व प्रकारची मदत करीत. त्यांच्या दयाळू आणि उदार स्वभावामुळे गावातील सर्वजण त्यांचा आदर करीत. त्यांनी आई आणि आम्हा तीन मुलांचे, तीन सुनांचे प्रेमाने संगोपन केले. त्यांच्या शिकवणीमुळे आम्ही स्वावलंबी आणि आत्मनिर्भर झालो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही चांगले संस्कार आणि शिक्षण घेऊ शकलो. त्यांची नातवंडेही सुशिक्षित, आनंदी आणि सुसंस्कारी आहेत. बाबांनी त्यांच्यावरही अपार प्रेम केले आणि नातवंडांसाठीही ते नेहमीच आधारस्तंभ राहिले. आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत होतो आणि त्यांची आठवण नेहमीच राहील.
बाबांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा प्रेमळ आणि शांत स्वभाव प्रत्येकाच्या मनात कायम कोरला गेला आहे.
आम्ही सदैव तुम्हाला स्मरणात ठेवू, आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांची आठवण आणि शिकवण आमच्या जीवनात कायम राहील. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही जे काही आज आहोत, ते त्याचे फळ आहे. तुमची छत्रछाया आम्हाला नेहमी मार्गदर्शन आणि प्रेरणा देईल. प्रिय बाबांना, मनःपूर्वक श्रद्धांजली. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.