बेळगाव : हिवाळी अधिवेशन 19 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार असून मंत्री, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी यांना दरवर्षीप्रमाणे उत्तम निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातील सर्व हॉटेल मालकांनी याबाबत आवश्यक ती तयारी करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.
बेळगाव हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी शहरातील हॉटेल मालकांची बैठक बोलाविण्यात आली होती.यावेळी बोलताना नितेश पाटील म्हणाले,हिवाळी आधिवेश कालावधीत जिल्हा प्रशासन हॉटेलच्या सर्व खोल्या ताब्यात घेत असल्याने त्या काळात इतर कोणासाठीही खोल्या देण्यात येऊ नयेत.मंत्री, आमदार, मान्यवर आणि उच्च अधिकारी यांच्या साठी सर्व हॉटेल मालकांनी निवासाची पुरेशी सोय उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
बेळगाव पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या, महानगरपालिका आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी आदी उपस्थित होते.