
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंजाळ येथे संतप्त घटना घडली असुन येथील नागरिक भीमराव लक्केबैलकर यांच्या मालकीच्या दुभती गाईवर पहाटे कोणा अज्ञातानी धारदार शस्त्राने घाव घातल्याने सदर गाईच्या गळ्यावर खोल खाच पडली असून काही शीरा तुटल्याने गायीला पाणी व चारा खाता येत नाही, गायीला एक लहान वासरू असून गाय गंभीर जखमी झाली आहे,

याबाबत मिळालेली माहिती अशी की कारण जाळ गावातील नागरीक भीमराव लक्केबैलकर यांची पोल्ट्री असून त्याच्या आवारातच गाईला ते चरण्यासाठी सोडतात नेहमीप्रमाणे सकाळी गायीला चरण्यासाठी सोडलेली होती नेहमीप्रमाणे गाय चरून शेतातील घराकडे आली असता गाय रक्त बंबाळ झाल्याचे व गाईच्या मानेवर खोलवर जखम झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, असता त्यांना वाटले की कोणातरी जंगली प्राण्याने हल्ला केला असेल म्हणून याची कल्पना त्यांनी ताबडतोब फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांना व पशु संगोपन खात्याच्या डॉक्टरांना दिली असता ताबडतोब त्यानी येवुन पाहणी केली असता व्हेटर्नरी डॉक्टर चरणतीमठ्ठ यांनी सांगितले की गाईला झालेली जखम ही कोणा जंगली प्राण्याने केलेली नसून धारदार कुराड किंवा कोयत्याने किंवा इतर शस्त्राने हल्ला केल्याने झाल्याचे सांगितले असता सर्वांच्या लक्षात आले की कोणातरी समाजकंटकाने विपरीत बुद्धीच्या व्यक्तीने सदर गाईवर हल्ला केला आहे असे समजले त्यानंतर व्हेटर्नरी डॉक्टर चिरंतीमठ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर गाईवर औषधोपचार केले, यावेळी फॉरेस्ट खात्याचे बीट गार्ड कल्लाप्पा रावळ करंजाळ, व फॉरेस्टर राजू पवार गुंजी उपस्थित होते, गायीची अंदाजे कीमत 20,000 असल्याचे समजते,

सदर घडलेली घटना हि दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे एका निष्पाप मुक्या प्राण्यावर असा हल्ला करणारे कीती उलट्या काळजाचे असनार हे दिसून येते, भीमराव यांची दोन्ही मुल भारतीय सैन्यदलात असुन भारत देशाची सेवा बजावत असतात, घरी पती पत्नी असे दोघेच असतात, व गावात देखील सर्वांशी त्यांचे संबंध सलोख्याचे आहेत, पण ईतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोटतीडकीने निर्दयीपणे गायीच्या मानेवर घाव घालणाऱ्या राक्षसी वृतीच्या प्रवृतीला राक्षसच म्हणायचे,
