रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची सरकारने नुकसान भरपाई रक्कम दिली नसल्याने चिकोडी न्यायालयाने बजावलेल्या आदेशानुसार चिकोडीच्या प्रांताधिकाऱ्यांचे वाहन,सार्वजनिक बांधकाम खात्याचे वाहन आणि फर्निचर जप्त करण्यात आले. प्रांताधिकारी ऱ्यांचे वाहन जप्त करायच्या वेळी प्रांताधिकारी माधव गित्ते आणि न्यायालयाचे बेलीफ यांच्यात शाब्दिक चकमक झडली
मांगुर गावातील बुद्धिराज पाटील यांची एकतीस गुंठे जमीन रस्त्यासाठी संपादित करण्यात आली होती.त्यानुसार न्यायालयाने बुद्धिराज पाटील यांना अकरा लाख सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावला होता.एक वर्ष उलटले तरी नुकसान भरपाईची रक्कम दिली नसल्याने चिकोडीच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने प्रांताधिकाऱ्यांचे वाहन आणि कार्यालयातील फर्निचर जप्त करण्याचा आदेश बजावला.त्यानुसार न्यायालयाच्या बेलिफनी प्रांताधिकाऱ्यांचे वाहन,कार्यालयातील फर्निचर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे वाहन जप्त केले.