
गोवा मुख्यमंत्र्यांच्या चिखले येथील सातेरी-केळबाय मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल ; आमदार विठ्ठल हलगेकर.
खानापूर ; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते जांबोटी भागातील चिखले येथील सातेरी-केळबाय मंदिराचे उद्घाटन पूर्वी ठरल्याप्रमाणे शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी होणार असल्याची माहिती खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्याला काही कामामुळे शनिवारी 10 मे रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाला हजर राहता येणार नाही असे कळविले होते. त्यामुळे सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा मंदिराला भेट देण्याचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक 7 मे रोजी निश्चित केला होता. परंतु पुन्हा या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बदल केला असून, पूर्वी ठरल्याप्रमाणे शनिवारी 10 मे रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांनी हजर राहणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज बुधवारी चिखले येथे येणार नसल्याची सर्वांनी नोंद घेण्याची विनंती, आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केली आहे.
