
खानापूर तालुक्यात, समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा.
खानापुर: कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते, संपूर्ण खानापुर तालुका पिंजून काढीत आहेत. तसेच प्रत्येक गावातून सरदेसाई यांच्या विजयाचा निर्धार केला जात आहे.
सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी हारूरी, शेडेगाळी, ढोकेगाळी गणेबैल, काटगाळी आदि भागात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठिक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि आरती करून सरदेसाई यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी सरदेसाई यांनी प्रत्येक गावात समितीच्या उमेदवाराला चांगले पाठबळ मिळत आहे. त्यामुळे समितीला चांगले यश मिळणार असल्याने, राष्ट्रीय पक्षांकडून मतदाराना विविध प्रकारची प्रलोभने दाखविली जात आहेत. त्यापासून मराठी भाषिकांनी दूर राहून आपली अस्मिता आणि स्वाभिमान जपणे गरजेचे आहे. प्रचार करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे कार्यकर्ते जबाबदारी घेऊन आपल्या भागात प्रचार करीत आहेत. त्यामुळे चांगले यश मिळेलअसा विश्वास आहे.
सध्या विविध गावांमध्ये रोजगार सुरू आहे. त्यामुळे रोजगार सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन, नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीच्या पाठीशी उभे राहून, आपली जबाबदारी पार पाडा असे आवाहन केले जात आहे. महिला व युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी संजीव पाटील, पुंडलिक पाटील, राजाराम देसाई, बाळकृष्ण पाटील, सुनील पाटील, रामचंद्र गावकर, सदानंद पाटील, दिगंबर देसाई, प्रशांत पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, भीमसेन करंबळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जांबोटी कणकुंबी भागामध्येही समिती उमेदवार निरंजन सरदेसाई यांना, मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. तसेच या भागातील विवीध भागात दररोज, नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. रवींद्र शिंदे, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, कृष्णा धुळ्याचे, बाळू पाखरे, मारुती देसुरकर आदी कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
जांबोटी कणकुंबी भागामध्येही समिती उमेदवार निरंजन सरदेसाई यांना, मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. तसेच या भागातील विवीध भागात दररोज, नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. रवींद्र शिंदे, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, कृष्णा धुळ्याचे, बाळू पाखरे, मारुती देसुरकर आदी कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
