
“बामणांचं खरकटं खायचं.की, मराठ्यांचं पाणी दाखवायचं” पोस्ट व्हायक्षलसमस्त ब्राह्मण समाजाचा अपमान.
खानापूर : कारवार लोकसभेच्या निवडणुकीची मतदानाची वेळ जस,जशी जवळ येत आहे. तसा प्रचार शिगेला पोहोचला असून, सोशल मीडिया व व्हाट्सॲप द्वारे वेगवेगळ्या पोस्ट फिरत असून, आज काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचे जवळचे नातेवाईक, व खानापुरातील काँग्रेसची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या मोबाईल वरून सर्वत्र एक पोस्ट व्हायरल झाली असून, त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “नंदगड च्या सुर्याजी पिसाळाची वळवळणारी जीभ हासडून कडेलोट करायची वेळ आली आहे. मराठ्यांनो, त्याच्यासारखं बामणांचं खरकटं खायचं की मराठ्यांचं पाणी दाखवायचं हे आता खानापूरनं ठरवायलाच हवं” अशी जातीवाचक व ब्राह्मण समाजाचा अपमान करणारी पोस्ट वायरल झाल्याने, खानापूर सह कर्नाटक, व संपूर्ण भारत देशातील व संपूर्ण कारवार क्षेत्रातील ब्राह्मण समाज काय भूमिका घेतोय हे पहावे लागेल. तसेच काँग्रेस पक्षाला, व काँग्रेसचे नेते आर व्ही देशपांडे व काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना ब्राह्मण समाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

काही ब्राह्मण समाजातील नेतेमंडळीना, “आपलं खानापूर” ने संपर्क साधून याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, काँग्रेसचे हल्याळचे विद्यमान आमदार व माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांनी खानापूर मध्ये दोन दिवस काँग्रेसचा प्रचार केला. देशपांडे हे जातीने ब्राह्मण आहेत. मग त्यांना खानापूर मध्ये प्रचारासाठी फिरवून त्यांचं खरकट का खाल्ला, असा प्रतिप्रश्न विचारला असून, लवकरच ब्राह्मण समाजाच्या नेते मंडळींची व्यापक बैठक बोलावून या गोष्टीचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कारवार लोकसभा क्षेत्रात हल्याळ, यल्लापूर, शीरसी, होन्नावर कारवार, भटकळ, कुमठा, खानापूर व कित्तूर तालुक्यात ब्राह्मण समाजाची संख्या जास्त असून, याचा परिणाम कारवार लोकसभा मतदार संघ व त्याचबरोबर संपूर्ण देशातील राजकारणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व धर्मीय समाज, मिळून-मिसळून राहण्याची आजपर्यंतची परंपरा आहे. व खानापूर तालुक्यात आज पर्यंत जातीवर आधारित कधीही राजकारण झाले नाही. त्यामुळे मराठा-ब्राह्मण वाद लावून, कोणी मतदान मिळविण्याचे स्वप्न बघत असेल. तर ते साध्य होणार नाही. अशी प्रतिक्रिया अनेक मराठा, ब्राह्मण व इतर समाजातील नेते मंडळींनी व्यक्त केली आहे.
