मुंबई : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर कीणेकर यांच्या नेतृत्वाखाली म ए समितीच्या पदाधिकाऱ्यांनीआज दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, यांची भेट घेऊन सीमाप्रश्न व विविध विषयांवर चर्चा केली, यावेळी चीफ सेक्रेटरी राकेश कुमार, व मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते
यावेळी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सीमाप्रश्न खटल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच 28 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून “चलो मुंबई” म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे त्याबाबत व सीमाप्रश्न संबधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, यावेळी समीतीचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, व आदि नेते मंडळी उपस्थित होते,