कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राची वाहने अडवण्याचा प्रयत्न केला पण तो पोलिसांनी हाणून पाडला .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून काही काळ गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसना काळे फासणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र सरकार संरक्षण देत आहे.महाराष्ट्रातील कन्नड जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकारने पावले उचलावीत.कर्नाटकच्या बसना काळे फासणाऱ्या,दगडफेक करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी देखील करवे कार्यकर्त्यांनी दिल्या.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी च्या निषेधाच्या घोषणा करवे कार्यकर्त्यांनी दिल्या.