
खानापूर : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादि आज सोमवार दि 10 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात येणार होती पण उमेदवार यादिवर एकमत होवू न शकल्याने उद्या मंगळवारी सायंकाळपर्यंत कींवा बुधवार दि 12 एप्रिल रोजी जाहीर करणार असल्याचे भाजपा पक्षाच्या वतीने आज सायंकाळी बेंगलोर येथे सांगण्यात आले आहे,
खानापूरात भाजपाचे इच्छुक उमेदवार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली म्हणून तालूक्यात फटाक्यांची आतिषबाजी केली,
आज सोमवारी उमेदवारी यादी जाहीर होणार होती ती आज झालीच नाही उद्या अथवा बुधवारी जाहीर करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे, असे असले तरी काल रात्री विठ्ठलराव हालगेकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या तोप्पीनकट्टी गावात व खानापुरातील काही चौका चौकात तसेच आज दुपारी जांबोटी व तालुक्यातील काही भागात विठ्ठलराव हलगेकर यांना उमेदवारी मिळाली असल्याच्या आनंदात फटाकड्यांची आशिष बाजी केली असल्याने तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, अनेक विद्यमान बलाढ्य आमदार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत, बेळगावातील पण अनेक बलाढ्य विद्यमान आमदार निवडणूक लढवीण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना देखील आपल्याला उमेदवारी नक्कीच मिळेल का याची खात्री देता येत नाही असे असताना भाजपाची उमेदवारी मिळाली म्हणून फटाकड्यांची अतिषबाजी करणे हे चुकीचे असल्याचे सर्व सामान्य भाजपाचे कार्यक्रते व नागरिक बोलत आहेत,
आणि जर का तिकीट मिळाले असेलच तर फटाकडी लावून आपल्याच पक्षाच्या इच्छुक असलेल्या उमेदवारांना हिणवणे व त्याची हिरमोड करून त्यांचा एकप्रकारे हा अपमान करण्याचा एक प्रकारच नव्हे का असा संतप्त सवाल भाजपाचे सर्व सामान्य कार्यकर्ते व नागरिक करत आहेत,
उमेदवारी मिळाली म्हणजे निवडून आलो असे नव्हे…???
तालुक्यातील सद्यस्थिती राजकीय परीस्थिती बघता कोणत्या पक्षाचा विजय होईल आणि कोण निवडून येईल हे निश्चितपणे खात्रीलायक सांगता येत नाही असे असताना आणि अधिकृतपणे भाजपाने उमेदवारी यादि घोषित पण केली नाही तसेच बेळगावच्या विद्यमान बलाढ्य आमदारांना आपल्याला उमेदवारी मिळणार किंवा नाही हे खात्रीने सांगता पण येत नाही असे असताना फटाक्यांची आतिषबाजी करून नेमके यातून काय साधायचे आहे, हा सर्व सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे,
शेवटपर्यंत भाजपा कोणाला उमेदवारी जाहिर करेल हे खात्रीलायक सांगता येत नाही
भाजपाचे वरीष्ठ नेते कोणाला उमेदवारी जाहीर करतील हे शेवटपर्यंत सांगता येत नाही कारण आजपर्यंतचा भाजपाचा इतिहास आहे, तेव्हा फटाक्यांची आतिषबाजी करून तालूक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे हे कितपत योग्य आहे व हे सर्व सामान्य नागरिकांना पटण्यासारखेही नाही याचा विचार समर्थक कार्यकर्त्यांनी व भाजपाच्या नेतेमंडळींनी केला पाहिजे व तुर्तास अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होईपर्यंत हे पोरखेळ बंद झालेतर बरे होईल असे भाजपाचे तळागाळातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे,
संपूर्ण कर्नाटकात भाजपा पक्षातर्फे अधिकृतपणे उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही पण संपूर्ण कर्नाटकात खानापूरची उमेदवारी कशी जाहीर झाली आणि कोणी केली याबाबतीत आज बेंगलोर येथे झालेल्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली असल्याचे खात्रीलायक समजते तसेच खानापूरात फटाक्यांची आतिषबाजी केलेली छायाचित्रे व व्हीडिओ सुध्दा सर्वानी बघुन संताप व्यक्त केला असल्याचे समजते,
