ऑस्ट्रेलियात मुसळधार पावसाने हाहाकार,20 हून अधिक लोकांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तीन राज्यांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. देशातील काही भागात 24 तास सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचे पाणी सुमारे 500 घरांमध्ये घुसले असून अनेकजण जण बेपत्ता आहेत. तर, देशात मुसळधार पावसामुळे आत्तापर्यंत 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलियाचे दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. व्हिक्टोरियाला या आठवड्यात पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्याची राजधानी मेलबर्नमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेकांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुसळधार पावस आणि अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, सुमारे 3,000 घरे आणि कार्यालय यांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.