अथणी : ऊस कापणीच्या यंत्रात अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
अथणी (प्रतिनिधी) : अथणी तालुक्यातील सप्तरसागर गावात ऊस कापणी यंत्रामध्ये अडकून एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
मृत महिलेचे नाव शोभा श्रीकांत संक्रत्ती (वय 54 वर्षं) आहे. स्वतःच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना मोठ्या ऊस कापणी यंत्राच्या तळभागात कपडे अडकून त्या यंत्रात ओढल्या गेल्याने त्यात गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कामगार आणि शेतकऱ्यांनी उस कापणी यंत्रांवरील सुरक्षेची उपाययोजना वाढविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ಅಥಣಿ : ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸುವ ಯಂತ್ರಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ಮಹಿಳೆ ಸಾವು
ಅಥಣಿ : ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸುವ ಬೃಹತ್ ಯಂತ್ರಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ರೈತ ಮಹಿಳೆ ಮೃತಪಟ್ಟ ಘಟನೆ ಅಥಣಿ ತಾಲೂಕಿನ ಸಪ್ತಸಾಗರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ.
ಶೋಭಾ ಶ್ರೀಕಾಂತ ಸಂಕ್ರಟ್ಟಿ (54) ಮೃತಪಟ್ಟ ಮಹಿಳೆ. ಸ್ವಂತ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುವ ವೇಳೆ ಯಂತ್ರದ ಬುಡಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ಮಹಿಳೆ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾಳೆ.
ಅಥಣಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ.

