
दुर्गा नगर आश्रय कॉलनीतील रहीवासी शीवाप्पा होसपेठे परवा आपल्या कुलदैवत ला दर्शनासाठी गेले असता त्याच रात्री शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली व संपुर्ण घर व सगळ्या वस्तू जळुन खाक झाल्या असता त्यांना खाण्यासाठी व घालण्यासाठी कपडे सुध्दा नव्हते याची कल्पना कोणीतरी माजी आमदार अरविंद पाटील यांना दिली असता ते त्या ठिकाणी तात्काळ धावुन गेले व त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तात्पुरती 5 पाच हजारची मदत खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी केली व त्यांना कपडे नसल्याने साड्या, कपडे सुध्दा दिले, व सरकार दरबारी प्रयत्न करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देतो असे सांगून धीर दिला यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष मझर खानापुरी उपस्थित होते,






