बेळगाव मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अशोक बाबुराव भंडारी यांचे वृद्धपकाळामुळे निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. बालपणापासून स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या विविध पदावर त्यांनी आपली सेवा अर्पण केलेली आहे. टपाल खात्यामध्ये 30 वर्षे सेवा करून 1993 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. मराठी ,संस्कृत ,कन्नड, हिंदी, इंग्रजी या भाषांच्यावर यांचे विशेष प्रभुत्व यांचे होते. 200 पेक्षा जास्त पुस्तकांचे त्यांनी भाषांतर केले आहे. ज्योतिषी व वास्तुशास्त्रामध्ये त्यांचा आघाड अभ्यास होता. त्यांचा अंत्यविधी शहापूर स्मशान भूमी मध्ये आज दुपारी 3.30 वाजता होणार आहे.