खानापूर : अरविंद पाटील यांच्या वाढदिवस व सत्कार सोहळ्याला आज उपस्थित असलेला नागरिक व महिलांचा प्रचंड जनसमुदाय म्हणजेच अरविंद पाटील यांनी तालुक्यात सहकार क्षेत्रात व तालूक्याच्या जडणघडणीत केलेल्या विकास कामाची व लोकांशी ठेवलेल्या जनसंपर्काची हीच खरी पोचपावती आहे असे प्रतिपादन “मराठा राज्य निगम” चे अध्यक्ष मारूतीराव मुळे यांनी केले, मलप्रभा क्रीडांगणावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अरविंद पाटील यांच्या वाढदिवस व सत्कार सोहळ्याला उपस्थित जवळ जवळ पंधरा हजार प्रचंड अशा लोकांच्या जनसमुदायासमोर केले,p
पुढे बोलताना ते म्हणाले की अरविंद पाटील यांनी केलेल्या प्रयत्ना मुळेच मला बीजेपी प्रवेश मिळाला व त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व तत्कालीन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याकडे पाठपुरावा करून मला मराठा राज्य निगमचे अध्यक्षपद मिळवुन दिले, त्यांच्या प्रयत्नामुळेच मराठा राज्य निगम च्या माध्यमातून मराठा समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री बसवराज बोमाई व तत्कालीन उपमुख्यमंत्री लक्ष्मणराव सवदी यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी राजश्री शाहू योजना व जिजामाता योजना व इतर योजना साठी 100 कोटीचे अनुदान दिले आहे याचे संपूर्ण श्रेय अरविंद पाटील यांनाच आपण देत असल्याचे सांगितले त्यांनी मला मराठा निगमचे अध्यक्षपद मिळवून दिले म्हणूनच मला हे मराठा समाजासाठी करता आले, बसवेश्वर महाराजांच्या पुण्य जन्मभूमीत जगभरातून लोक दर्शनासाठी येतात त्या लोकांना मराठा समाजाचा इतिहास समजावा शिवाजी महाराजांचा पराक्रम समजावा म्हणून सरकारकडे शिवसृष्टी उभारण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी शिवसृष्टी उभारण्यासाठी दहा कोटीचे अनुदान मंजूर केले असल्याचे सांगितले तसेच बेळगाव जिल्हातील मराठा समाजाच्या विकासासाठी 3000 हजार लोकांची यादी बनवण्यात आली असून त्यांना अनुदान देणार असल्याचे सांगितले तसेच दावणगिरी जिल्ह्यातील चंन्नगिरी तालुक्यातील होदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी महाराज यांची समाधी दुर्लक्षित होती ती आता सरकारने फंड दिल्यामुळे समाधी स्थळाचा विकास होऊ शकला तसेच मराठा समाजाच्या युवकांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी दहा लाख रुपयाची योजना सुद्धा मराठा राज्यनिगमाच्या माध्यमातून सुरू केली असल्याचे सांगितले,
सोहळ्याची सुरूवात गोमातेच्या पूजनाने झाली तत्पूर्वी भाजपा युवा नेते पंडित ओगले व ता प माजी सदस्या वासंती बडिगेर यांचे भाषण झाले, त्यानंतर वाढदिवस सत्कार सोहळा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्वागत व प्रास्ताविक भाषणाने झाली, ते म्हणाले की अरविंद पाटील यांचे विकासभुमी नेतृत्व व जनसामान्यांत त्यांची असलेली प्रतिमा, त्यांचा धाडसीपणा व त्यांनी तालूक्यात केलेली विकास कामे हे सगळे पहाता त्यांचा वाढदिवस व सत्कार सोहळा आम्ही मोठ्या प्रमाणात जनतेसमोर आयोजित केला होता व त्याला आज अनुसरून जनतेने त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी ईतका मोठा जनतेचा जनसमुदाय जमला आहे असे म्हणून त्याबद्दल जनतेचे त्यांनी आभार मानले,
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मणराव सवदी बोलताना म्हणाले की राजकारण हा नशिबाचा खेळ असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये अरविंद पाटील विठ्ठलराव हलगेकर असे बरेच जण इच्छुक आहेत तिकीट कोणालाही मिळू देत सर्वांनी पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचा व उमेंदवाराचा प्रचार केल्यास येत्या निवडणुकीत तालुक्यात भाजपचा उमेदवार आमदार म्हणून नक्कीच निवडून येणार यात शंका नसल्याचे सांगितले असता भाजपाचे नेते लैला शुगरचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांनी हात वरती करून ओरडून सांगितले की तिकीट कोणालाही मिळू देत आम्ही एकत्र राहणार व पक्षासाठीच कार्य करणार व पुढील आमदार भाजपाचाच करणार असी ग्वाही देत ओरडून सांगताच जनसमुदायाने प्रचंड अशा टाळ्याच्या गजरात विठ्ठल हलगेकर यांचे अभिनंदन केले पुढे बोलताना सवदी म्हणाले की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला तरी मी पक्ष देईल ती जबाबदारी घेवुन पक्षासाठी प्रामाणिक कार्य करत राहिलो मला भाजपा पक्षाने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा निवडणूक प्रभारी म्हणून माझी नेमणूक केली मी महाराष्ट्रात जाऊन कार्य करत असताना एक दिवस बेंगलोर येथुन माझ्या जवळच्या व्यक्तीचा फोन आला मला म्हणाला तुम्ही ताबडतोब उद्या सकाळी साडेदहापर्यंत बेंगलोरला पोहोचायचे आहे तुमची राज्याचे मंत्री म्हणून निवड झाली आहे मला आश्चर्य वाटले मी त्याला म्हणालो तू शुद्धीत आहेस का दारू बिरू पिऊन बोलतोस काय त्यावेळी तो म्हणाला साहेब मोबाईल उघडून बघा त्यावेळी मी माझा मोबाईल उघडून बघितला असता पक्षाच्या हाय कमांड चा मेसेज होता तुमची कर्नाटक राज्याचा मंत्री म्हणून निवड झालेली असून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायची आहे मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला माझा पराभव झाला तरी मी पक्षासाठी प्रामाणिक कार्य केले त्यामुळे भाजपच्या हाय कमांडने मी विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य नसताना देखील उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली, आणि हे सगळे भाजपमध्येच होऊ शकते म्हणून खानापुरातील इच्छुक उमेदवारांनी तिकीट कोणालाही मिळू देत सर्वांनी पक्षासाठी प्रामाणिक कार्य करा त्याची दखल निश्चितच हाय कमांड घेतील असे सांगताच इच्छुक उमेदवार व उपस्थित जनसमुदायातून टाळ्यांचा कडकडाट झाला हुबळी येथे जन संकल्प रथयात्रा सुरू असून ती मध्येच थांबवून अरविंद पाटील यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितलेl
यावेळी उपस्थित स्वामी, महाराज व मठाधिपतींच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते अरविंद पाटील यांचा सहपत्नीं सत्कार करण्यात आला
यावेळी खासदार ईराण्णा कडाडी, कीतूरचे आमदार महांतेश दोडगौडर यांची अरविंद पाटील यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली, यावेळी बैलहोंगल चे माजी आमदार जगदीश मेटगुड सुध्दा उपस्थित होते
सत्काराला उत्तर देताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की गेली तीस वर्षे मी तालुक्यात समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून तालुक्यात कार्य करत असून तालुक्यातील जनतेशी मी संपर्क ठेवला आहे त्याची पोच पावती म्हणून इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचे माझ्यावर असलेले प्रेम असेच राहू देत म्हणून स्टेजवर खाली बसुन डोके टेकुन जनतेसमोर नतमस्तक होऊन जनतेला नमस्कार केला व जनतेचे आभार मानलेमानले असता टाळ्यांचा कडकडाट झाला,
सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते म्हणाले की गेल्या निवडणुकीत लोकांनी पाचशे रुपयांची नोट व दिलेली साधी साडी पाहून मतदान केले त्यामुळे आज तालुक्याचे तीन तेरा वाजलेले आहेत 1956 पासून आज पर्यंत इतके आमदार झाले कोणीही रस्त्याच्या विकास कामात व इतर बांधकामात किंवा वाळू काढून उपजीविका करणाऱ्या गरीब जनतेकडून कोणा आमदाराने एक रुपयाही घेतला नाही पण आता रस्त्याच्या विकास कामात सतरा टक्के दिल्याशिवाय कामाला सुरुवात करण्यास दिली जात नाही भाजप सरकारने तालुक्यात हर घर नळ जल योजना सुरू केली आहे त्याच्यात सुद्धा टक्केवारी सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व विकासकामे एकदम निकृष्ट दर्जाची झालेली असून ताबडतोब खराब होत आहेत या विकास कामातूनच केलेल्या भ्रष्टातरातून आलेले पैसे येत्या निवडणुकीत तुम्हाला दिले जातील वेगवेगळी आमिषे दिली जातील परंतु गेल्या निवडणुकीत तुम्ही मतदान करून जसे फसलात तसे या वेळेला फसू नका असे आव्हान करताच उपस्थित महिला व नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला पुढे ते म्हणाले की भाजपाचे आमदार कैलासवासी प्रल्हाद रेमानी यांनी इटगी येथे वस्ती शाळेची 20 कोटीची योजना मंजूर केली होती परंतु त्या ठिकाणी दुसरी एक शाळा असल्यामुळे मी आमदार झाल्यानंतर ती योजना आमटे येथे घेऊन आलो हि सत्य परिस्थिती आहे, असे असताना विद्यमान लोकप्रतिनिधी सदर योजना आपण मंजूर करून आणल्याचे खोटे सांगुन फुकटचे श्रेय लाटत असल्याचे सांगितले, तालुक्यात वाळू काढणार्यांच्या कडून प्रत्येक ट्रकेमागे एक लाख वीस हजार रुपये चा हप्ता घेतला जातो तो कुणाच्या घशात जातो हे जनतेला चांगलेच माहित आहे सामान्यातल्या सामान्य वाळू काढणाऱ्या गरीब लोकांना सुद्धा ट्रॅक्टर मागे हजार रुपये चा हप्ता घेतला जातो हा सगळा भ्रष्टाचार इतके दिवस तालुक्यात नव्हता तो आता पहायला लोकांना मिळत आहे त्यामुळे लोकांनी शहाणे होऊन पुढे निर्णय घ्यायचा आहे असे सांगताच लोकांनी टाळ्या मारून प्रतिसाद दिला शेवटी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या भाषणाने समारंभाची सांगता झाली, त्यानंतर अरविंद पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी झाली लोकांनी सभा संपल्यानंतर जवळ जवळ दोन तास रांगेत उभा राहून अरविंद पाटील यांना प्रत्यक्ष भेटून गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या
व्यासपीठावर भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कुबल आवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू स्वामी तसेच विविध मठाचे स्वामी, मठाधिपती तसेच भाजपाचे नेते विठ्ठलराव हलगेकर वन निगम चे संचालक सुरेश देसाई, माजी जी प स जोतीबा रेमाणी, माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील, तालुका पंचायत च्या माजी सभापती राजश्री देसाई माजी तालुका पंचायत सदस्या वासंती बडिगेर जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, कीरण यळूरकर, व भाजपाचे पदाधिकारी व नेतेमंडळी उपस्थित होते,
सत्कार सोहळ्याला तालुक्यातील प्रत्येक गावातून जातीभेद भाषा भेद न करता जवळ जवळ 15000 हजार नागरिकांनी व महिलांनी उपस्थिती दाखवून अरविंद पाटील यांना शुभेच्छा दिल्या मंडपात दहा हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्या संपूर्ण खुर्च्या भरून लोकांनी मंडपाच्या बाहेर व जांबोटी ला जाणाऱ्या रस्त्यावर थांबून सत्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शविली,