
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्व, नंदगड मार्केटिंग सोसायटी चेअरमन माजी आमदार अरविंद पाटील यांचा उद्या 54 वा वाढदिवस सोहळा सर्व पक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यक्रत्याकडून श्री मलप्रभा क्रीडांगणावर उद्या शुक्रवार दि 17 मार्च 2023 रोजी मठाधिपती (स्वामी), मंत्रीमोहदय खासदार, व जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधीं व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाढदिवस व सत्कार कमिटीचे अध्यक्ष भाजपा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई हे राहणार आहेत,

अरविंद पाटील म्हणजे धाडसी नेता व धाडसी व्यक्तीमत्व तसेच जनतेच्या अडीअडचणींना व वाईट प्रसंगी उपयोगी पडणारा व धावुन जाणारा नेता,
तालूक्यात किंवा इतरत्र अपघात झाला असल्याचे समजताच एँबुलन्स पोहचण्याआधी गाडी घेऊन अपघात स्थळी पोहचुन अपघातातील जखमींना जात पात न पहाता दवाखान्यात दाखल करून स्वतः उपचार करण्यास डॉक्टरना मदत करून प्रसंगी जखमीच्या नातेवाईकांची वाट न पहाता पुढील उपचारासाठी स्वता जबाबदारी घेऊन बेळगाव पर्यंत जावुन दवाखान्यात दाखल करणारा असा नेता म्हणजे माजी आमदार अरविंद पाटील म्हटल तरी वावगे ठरणार नाही,

खानापूर येथे नदीला पुर आला असताना कंबरभर पाण्यात घुसून नागरिकांना मदत, करणारा नेता,
अगस्ट 2019 आणि ऑगस्ट 2021 हि दोन वर्षे सर्वत्र भयंकर पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला होता त्यावेळी संपूर्ण खानापूर शहर तसेच तालुक्यातील आजूबाजू ची गावे पाण्याखाली गेली होती त्यावेळी दिवस व रात्र न म्हणता आपल्या कार्यकर्त्यांसह कमरेपेक्षा जास्त पाण्यात घुसून लोकांना मदत करून पाण्यातून बाहेर काढून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करून खाण्या-पीण्याची व कपडेलतेची व्यवस्था करणारा लोकनेता म्हणजे अरविंद पाटील खानापूर दुर्गा नगर व खानापूर मारुती नगर येथे पाणी भरून नागरिक घरात अडकले होते त्या ठिकाणी एनडीआरएफ व स्वतःच्या कार्यकर्त्यांसह आत पाण्यातून घरात घुसून लोकांना बाहेर काढणारा खरा लोकनायक नेता म्हणजे माजी आमदार अरविंद पाटील होय,

तसेच कबनाळी येते नदी नाल्यांना पूर येऊन खानापूर शी संपर्क तुटला होता त्या गावातील संपूर्ण नागरिक आजारी पडले होते पण कबनाळीला जायला ॲम्बुलन्सला व डॉक्टरच्या टीमला रस्त्यात झाडे पडल्याने रस्ता नसल्याने जाता आले नाही डॉक्टरची टीम वापस येत होती याची माहिती अरविंद पाटलांना समजताच आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी धावून गेले व शेतातील शेतकऱ्याची कुऱ्हाड मागून घेऊन स्वतः झाडे तोडून रस्ता मोकळा केला, तसेच कबनाळीचा कच्चा रस्ता सुद्धा वाहून गेला होता त्या ठिकाणी सिमेंट पाईप लावून रस्ता मोकळा करून डॉक्टरांची टिम त्या ठिकाणी पोहचवली व संपूर्ण गावावर उपचार करण्यात आले, तसेच संपूर्ण तालुकाभर जिथे जिथे पूर आला होता लोंढा भाग राहू देत किंवा पारिश्वावाढ भाग किंवा जांबोटी भाग असुदेत त्या प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्या लोकांना रेशन किटचे वाटप सुद्धा केले,

कोरोना काळात प्रत्येक नागरिकाच्या घरी जावुन धिर देणारा, व काळजी घेणारा नेता
कोरोना काळात मार्च 2020 व एप्रिल 2021 या काळात कोरोना रोगाने थैमान घातले होते, सर्व नागरिक व नेतेमंडळी बाहेर पडण्यास घाबरत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता संपुर्ण तालूक्यात फिरून प्रत्येक घराघरात जावुन कोरोना बद्दल लोकांनी घ्यावयाची काळजी व दक्षता याची माहिती नागरिकांना देवुन त्यांना धीर देणारे व संपूर्ण तालूक्यात मास्क, सँनीटायझर वाटण्यास सुरूवात करणारे पहिले व्यक्ती अरविंद पाटीलच होते, याचा अनुभव व माहिती जनतेला आहेच, तसेच कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह न घाबरता स्वतः त्यांनी उचलून अंत्यसंस्कार सुध्दा केले आहेत,

खानापूर व ईतर ठिकाणी कोठेही कोणाच्याही घरी काही बरे वाईट झाल्यास त्या ठिकाणी आपले मीत्र असुदेत कींवा राजकीय विरोधक असू देत कींवा विरोधी पक्षाचे लोक असुदेत भेदभाव न करता वैर विसरून त्याठिकाणी सदर कुटूंबाची भेट घेऊन त्याना धिर देणारा व मृतदेहाला खांद्या देणारा अजात शत्रुमत्व लोकनेता म्हणजे अरविंद पाटील साहेबच असे लोक म्हणतात त्याकडे पाहिले असता त्यात वावगे काही नाही असे वाटते,


तालूक्यात आमदार म्हणून व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणून अनेक विकास कामे
आमदार असताना त्यांनी तालूक्यात अनेक विकास कामे केली असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून तालुकाभर जिल्हा बँकेच्या शाखा उभारल्या व संपूर्ण शेतकऱ्यांना पत पुरवठा केला तसेच बिडी भागातील 20 गावांना पाणीपुरवठा करणारा प्रकल्प देखील त्यांनी स्वखर्चाने उभारला तसेच तालूक्यात छोटे छोटे काही बंधारे बांधून शेतीसाठी पाण्याची सोय देखील केली आहे, अशा या लोकनेत्याच्या वाढदिवसाला संपुर्ण तालुक्यातून सर्वपक्षीय नेते मंडळी व कार्यकर्ते तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावुन शुभेच्छा देणार आहेत, आशा या लोक नेत्याला “आपलं खानापूर” न्यूज पोर्टल व “आपलं खानापूर” फेसबुक ग्रुपकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

