
बेळगाव – भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प यात्रेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज बेळगाव दौरा असून त्यांची पक्ष संघटने विषयी बैठक तसेच एम के हुबळी येथे जाहीर सभा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांचे काल रात्री हुबळी येथे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते,
खानापूर मधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार
हुबळी येथील होणाऱ्या जाहीर सभेची भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातून लाखो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असून खानापूर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारीनी देखील जोरदार तयारी केली आहे खानापूर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सदर सभेला उपस्थित राहणार असून भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते लैला शुगर चेअरमन विठ्ठलराव हलगेकर, महिला राज्य कार्यकारिणी सदस्यां धनश्री सरदेसाई, सेक्रेटरी बसवराज सानिकोप, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपीनकट्टी, व आदी नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे,
