फालतू खर्चाला फाटा ; माजी विद्यार्थ्यांचा आगळावेगळा स्नेहमेळावा.
खानापूर ; आजकाल कोणत्याही कार्यक्रमात, विशेषतः शाळांच्या स्नेहसंमेलनात, अनावश्यक खर्च करण्याची एक नवीन प्रथाच पडली आहे. आलिशान स्टेज, महागडी सजावट, आणि इतर दिखाऊ गोष्टींवर हजारो-लाखो रुपये खर्च केले जातात. हे सर्व क्षणिक असते आणि त्यातून कोणाचाही फारसा फायदा होत नाही. पण खैरवाड. ता. खानापूर प्राथमिक शाळेच्या 1998-99 च्या 7 वी च्या माजी विद्यार्थ्यांनी,शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक वेगळाच पायंडा पाडला. “फंक्शन करून फालतू खर्च करण्यापेक्षा शाळेला संगणक भेट देऊन आगळावेगळा स्नेहमेळावा साजरा केला.” हा निर्णय केवळ स्तुत्यच नाही, तर समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे.
गेले काही महिने माजी विद्यार्थी परशराम यळगुकर,उत्तम कुमानाचे, नारायण पाटील आणि शाळासुधारणा अध्यक्ष भुजंग हुंदरे यांच्या मध्ये स्नेहमेळाव्याच्या तयारीबद्दल चर्चा सुरू होती. नेहमीप्रमाणेच, भव्य कार्यक्रमाची कल्पना मांडली गेली, पण त्यात एक वेगळा विचार पुढे आला. या माजी विद्यार्थ्यांनी सुचवले की, ‘आमचा स्नेहमेळावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता, तो कायमस्वरूपी उपयोगी ठरेल असा साजरा करूया.’ ही कल्पना सर्वांना आवडली. या निर्णयामागे काही स्पष्ट उद्दिष्टे होती. एक म्हणजे, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे. आजचे युग हे डिजिटल युग आहे. संगणक हे केवळ एक साधन नसून, शिक्षणाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे हे गरजेचे आहे. दुसरं म्हणजे, खर्चाचा सदुपयोग करणे. स्नेहमेळाव्यावरील तात्पुरता खर्च टाळल्यामुळे वाचलेले पैसे थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खर्च करण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम खूप साधा पण प्रभावी होता. कोणताही अनावश्यक दिखावा नव्हता. प्रथम सर्व माजीविद्यार्थ्याच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. सहशिक्षक रोहित बागे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले व आपण सर्व विद्यार्थ्यांना आपण स्वतः जबाबदारी घेऊन संगणकाचे शिक्षण देण्याची व ह्या संगणकाची देखरेख करणार असल्याचे उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सांगितले. शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष भुजंग हुंदरे, माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करताना म्हणाले, हा संगणक फक्त एक वस्तू नाही, तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी आहे. तुम्ही केलेल्या या मदतीबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. यातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अधिक विकसित करण्याची संधी मिळेल. तुमचे खूप खूप धन्यवाद.” “तुमच्या या प्रेमळ आणि अनमोल भेटीमुळे आम्ही भाराऊन गेलो आहोत. हा संगणक आमच्या शाळेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या या उदारतेबद्दल मी तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही.
श्री कामणु इराप्पा पाटील यांनी आपण आजपर्यंत भरपूर माजी विद्यार्थ्यांना स्नेहमेळावा साजरा करताना इंस्टाग्राम वर रिल्स पहिले आहे, पण असा हा आगळेवेगळा स्नेहमेळावा पाहण्याची ही पहिलीच वेळ आणि कदाचित आपल्या तालुक्यातील पहिलाच स्नेहमेळावा असेल, असे उद्गार काढले. “या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने शाळेच्या भविष्यासाठी आणि या पुढे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
यानंतर या विद्यार्थ्यांनी उर्वरित दिवस राजहंसगड येथील शिवाजी महाराजांच्या सानिध्यात आनंदाने घालविला. हा स्नेहमेळावा भरविण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी परशराम नारायन यळगुकर, उत्तम भैरु कुमानाचे आणि नारायण गुंडू पाटील यांनी हा स्नेहमेळावा भरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कार्यक्रमाच्या शेवटी संगणकाचे अनावरण शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. संगणक भेट देताना, विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद स्पष्ट दिसत होता. हा आनंद कोणत्याही महागड्या सजावटीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.
या कृतीमुळे समाजाला एक महत्त्वाचा संदेश मिळाला आहे. कोणताही कार्यक्रम साजरा करण्यासाठी पैसा पाण्यासारखा खर्च करणे आवश्यक नसते, तर तो कार्यक्रम कसा अर्थपूर्ण बनवता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. शिक्षण हे कोणत्याही समाजाचा पाया आहे आणि या पायाला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
या स्नेह मेळाव्यामध्ये उत्तम कुमानाचे, नारायण पाटील, पराशरम यळगुकर, रवळू गावडे, संतोष सुतार, ईश्वर गुरव ,इराप्पा पाटील, पुंडलिक मडवाळकर, कल्लाप्पा पाटील, सुरेश तळवार, प्रदीप पाटिल, परशराम वारगावडे, संदीप कंग्राळकर,
रंजीता कालेकर, अनिता वारगावडे, प्रतिभा गुरव, ललिता कांग्राळकर, वनश्री मिटकर, संगीता पाटील, तुळसा पाटील,वंदना पाटील, संगीता गुरव, देमाक्का भुजगुरव, नंदा पाटील, दीपा मनोळकर, अर्चना पाणेरी यांनी सहभाग घेतला.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच फायदा झाला नाही, तर समाजातील इतर शाळांसाठीही एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. फालतू खर्च टाळून शिक्षणाला बळ देणे, हाच खरा “प्रगतीशील” विचार आहे.
ಅನಾವಶ್ಯಕ ಖರ್ಚಿಗೆ ಕಡಿವಾಣ ; ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಅನ್ಯ ರೀತಿಯ ಸ್ನೇಹಮಿಲನ.
ಖಾನಾಪುರ : ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಮಿಲನ ಎಂದರೆ ಭವ್ಯ ಅಲಂಕಾರ, ಆಕರ್ಷಕ ವೇದಿಕೆ, ಅನಾವಶ್ಯಕ ಖರ್ಚು ಎಂದೇ ಪ್ರಚಲಿತ. ಆದರೆ ಖೈರವಾಡ (ತಾ. ಖಾನಾಪುರ) ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯ 1998-99ನೇ ಸಾಲಿನ 7ನೇ ತರಗತಿಯ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇದಕ್ಕೆ ಅಪವಾದವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದರು.
ಶುಕ್ರವಾರ, 5 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2025ರಂದು ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆಯ ಪ್ರಯುಕ್ತ, ಈ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಾಲೆಗೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ದೇನಿಗೆ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಮಾಡಿ ಸ್ನೇಹಮಿಲನವನ್ನು ಆಚರಿಸಿದರು. ವ್ಯರ್ಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಹಣ ವೆಚ್ಚ ಮಾಡದೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಲಾದ ಈ ಉಪಕ್ರಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ.
ಸರಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಈ ಸ್ನೇಹಮಿಲನದಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿ ಪೂಜೆ, ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನ ಹಾಗೂ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಗಳ ಅನಾವರಣವನ್ನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೆರವೇರಿಸಿದರು. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸ್ವೀಕರಿಸುವಾಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮುಖದಲ್ಲಿನ ಸಂತೋಷ ಎಲ್ಲರ ಮನ ಗೆದ್ದಿತು.
ಶಾಲಾ ಸುಧಾರಣಾ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಭುಜಂಗ ಹುಂದರೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾ, “ಈ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಕೇವಲ ಒಂದು ಯಂತ್ರವಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೊಸ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ದಾನಶೀಲತೆಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು,” ಎಂದರು.
ಅದೇ ವೇಳೆ ಶ್ರೀ ಕಾಮಣು ಇರಪ್ಪ ಪಾಟೀಲ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪಟ್ಟುತಾ: “ಇಷ್ಟರವರೆಗೂ ಹಲವು ಸ್ನೇಹಮಿಲನಗಳನ್ನು ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಂನಲ್ಲಿ ಕಂಡಿದ್ದೇನೆ. ಆದರೆ ಇಂತಹ ಅರ್ಥಪೂರ್ಣ ಮಿಲನವನ್ನು ಎಂದಿಗೂ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ಬಹುಶಃ ಇದು ತಾಲ್ಲೂಕಿನಲ್ಲೇ ಮೊದಲ ಪ್ರಯತ್ನ ಇರಬಹುದು,” ಎಂದು ಹೇಳಿದರು.
ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ರಾಜಹಂಸಗಡದಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿ ಸಮಯ ಕಳೆಯುವ ಮೂಲಕ ಸ್ನೇಹವನ್ನು ಮತ್ತಷ್ಟು ಗಟ್ಟಿಗೊಳಿಸಿದರು. ಪರಶುರಾಮ ಯಳುಗುಕರ, ಉತ್ತಮ ಕುಮಾಣಚೆ, ನರಾಯಣ ಪಾಟೀಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಗೆ ವಿಶೇಷ ಶ್ರಮವಹಿಸಿದರು.
ಈ ಸಂದರ್ಭ ಉತ್ತಮ ಕುಮಾಣಚೆ, ನಾರಾಯಣ ಪಾಟೀಲ, ಪರಶುರಾಮ ಯಳಗುಕರ, ರವಳು ಗಾವಡೆ, ಸಂತೋಷ ಸುತಾರ, ಈಶ್ವರ ಗುರುವ, ಇರಪ್ಪ ಪಾಟೀಲ, ಪುಂಡಲಿಕ ಮಡವಾಳಕರ, ಕಾಳ್ಳಪ್ಪ ಪಾಟೀಲ, ಸುರೇಶ್ ತಳವಾರ, ಪ್ರದೀಪ ಪಾಟೀಲ, ಪರಶುರಾಮ ವಾರಗಾವಡೆ, ಸಂದೀಪ ಕಾಂಗ್ರಾಳಕರ, ರಂಜಿತಾ ಕಾಳೇಕರ್, ಅನಿತಾ ವಾರಗಾವಡೆ, ಪ್ರತಿಭಾ ಗುರುವ, ಲಲಿತಾ ಕಾಂಗ್ರಾಳಕರ, ವನಶ್ರೀ ಮಿಟಕರ, ಸಂಗೀತಾ ಪಾಟೀಲ, ತುಳಸಾ ಪಾಟೀಲ, ವಂದನಾ ಪಾಟೀಲ, ಸಂಗೀತಾ ಗುರುವ, ದೇಮಕ್ಕಾ ಭುಜಗುರುವ, ನಂದಾ ಪಾಟೀಲ, ದೀಪಾ ಮನೋಳಕರ, ಅರ್ಚನಾ ಪಾಣೇರಿ ಮುಂತಾದವರು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು.
ಈ ವಿಭಿನ್ನ ಸ್ನೇಹಮಿಲನದ ಮೂಲಕ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಂದೇಶ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ – ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಚರಣೆಗೆ ಆರ್ಭಟದ ಖರ್ಚು ಬೇಡ; ಅರ್ಥಪೂರ್ಣ ಕಾರ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಪ್ರಗತಿಯ ದಾರಿ.

