नाशिक : नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्या पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली.
भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. अहमदाबाद व पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूएट व बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या.
नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी महिन्यात पासून
Leave a comment
Leave a comment