140 प्रवांशाचा जीव टांगणीला, 36000 फूट उंचीवर विमानात तांत्रिक बिघाड, दोन तासापासून हवेत घिरट्या.
एअर इंडिया फ्लाईट : त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिची विमानतळाचे संचालक गोपालकृष्णन यांनी याच्याविषयी माहिती दिली. विमानाच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे विमान विमानतळावर उतरू शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर 20 हून अधिक रुग्णवाहिका आणि 50 अग्निशमन दल तैनात करण्यात आलं आहे, असं गोपालकृष्णन यांनी सांगितलं आहे. विमानात 140 प्रवाशी असल्याची माहिती देखील मिळाली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक IX613 मध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळतीये.
त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिची विमानतळाचे संचालक गोपालकृष्णन यांनी याच्याविषयी माहिती दिली. विमानाच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे विमान विमानतळावर उतरू शकत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर 20 हून अधिक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आलं आहे, असं गोपालकृष्णन यांनी सांगितलं आहे. विमानात 140 प्रवाशी असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक IX613 मध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळतीये. यानंतर पायलटच्या विनंतीवरून तिरुचिरापल्ली विमानतळावर एमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. तिरुचिरापल्लीहून शारजाला जाणारे B737-800 लँडिंग करण्यापूर्वी इंधन भरत होते. विमानतळावर सर्व नियमांचे पालन केले जात आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे सध्या अधिकाऱ्यांच्या धाकधूक देखील वाढली आहे.