मणतुर्गा तालुका खानापूर येथील रहिवासी रेणुका नारायण देसाई वय वर्षे 60 या खानापूर येथील बेळगाव-गोवा मार्गावरील श्रीमलप्रभा नदी पुलावरून पायी चालत जात असताना अज्ञात एक्टिवा दुचाकी स्वराने त्यांना ठोकले असता त्या गंभीर जखमी होऊन खाली पडल्या, त्याच वेळी योगायोगाने तेथून माजी आमदार अरविंद पाटील आपल्या गावाकडे जात असताना त्यांनी ही घटना पहिली व सदर महिलेला आपल्या गाडीतून सरकारी दवाखान्यात दाखल केले, सदर महीला ग्राम पंचायत सदस्य तालुका संघटनेचे अध्यक्ष वीणायक मुतगेकर यांच्या त्या मावशी असल्याचे समजते, सदर दुचाकीस्वाराने सदर महिलेला ठोकर मारून पळ काढला असल्याचे समजते, पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत,