
रत्नागिरी : राजकीय वर्तुळातून अपघाताची सत्र सुरु आहे. राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिका नाव घेत नाहीय. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचाही करताना गाडीला अपघात झाला. त्यानंतर आता आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.
योगेश कदम यांना Y+ सुरक्षा आहे. त्यांच्या गाडीसोबत पोलिसांची गाडी होती. अपघात झालेल्या ठिकाणी यापुर्वी अनेकदा अपघात झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहे. त्यानंतर दखल घेतली जात नाही. योगेश कदम अपघातातून वाचले नसते तर काही उपययोजना सुरु झाली असती, असा आरोपच आमदार योगेश कदम यांनी केला. हिवाळी अधिवेशात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्माक असल्याचे सांगितले
घातपाताची व्यक्त केली शक्यता
दरम्यान या अपघातसंदर्भात योगेश कदम यांनी हा अपघात घातपात असल्याची शक्यता नाकारली नाही. अपघाताचा पॅटन साधारण अपघातासारखा नाही. माझ्या गाडीच्या मागेपुढे पोलिसांची गाडी असताना डप्परने धडक दिली. त्यामुळे शंका घेण्यास मोठा वाव असल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी बोलतांना सांगितले आहे,
