करंबळ क्रॉस खानापूर येथील बेळगाव गोवा महामार्गावर बनविण्यात आलेल्या ब्रिजच्या खाली करंबळ कडून खानापूरच्या दिशेने जात असलेल्या मारुती कारला अचानक आग लागून पेट घेतल्याने गाडीचे बरेच नुकसान झाले आहे,
गाडी मालकाने सतर्कता दाखवून गाडी बाजूला लावून बाहेर पडले असता तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी पाणी ओतून आग विजविण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात येत नव्हती इतक्यात रूमेवाडी क्रॉस येथील कार रिपेअर करणारे भरमानी मेस्त्री त्या ठिकाणी आले व त्यांनी बॅटरी ची वायर काढली असता नागरिकांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली कारचे वायरिंग व इंजिन जवळील फायबरचे साहित्य जळाले आहे, सदर कार खानापूर फीश मार्केट जवळ असलेल्या हॉटेल आराध्या चे मालक श्री गावडा यांची असल्याचे समजते
सामाजिक कार्यकर्ते नारायण काटगाळकर, भरमानी मेस्त्री व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून आग विझवली,