पारीश्वाड : खानापूर पोलीस ठाण्याच्या आखत्यारीत येणाऱ्या पारीश्वाड गावच्या हद्दीतील मलप्रभा नदीच्या काठावर काल दि 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी खानापूर पोलिसांनी आठ जुगारीसह एकोणीस हजार पाचशे रुपये रक्कम जप्त केली आहे,
पारीश्वाड गावात मलप्रभा नदीच्या काठावर बसुन काही लोक पैसे लावुन ईस्पीक जुगार खेळत असल्याची माहिती खानापूर पोलीस स्थानकाचे सब इन्स्पेक्टर प्रकाश राठोड यांना मिळाली असता ताबडतोब त्यांनी खानापूरचे पोलीस इन्स्पेक्टर रामचंद्र नाईक व बैलहोंगलचे डीएसपी रवी डी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यासह पारीश्वाड येथे धाड टाकून ईस्पीक खेळणाऱ्या आठ जुगारीना अटक करून 19500 रुपये रक्कम जप्त केली,
या गुन्हात 1) इमाम महमंदसाब तालिकोटी राहणार पारीश्वाड 2) शब्बीर इब्राहिमसाब बसरीकट्टी पारीश्वाड, 3) मुगुटसाब हुसेनसाब नदाफ एम के हुबळी, 4) शिवानंद मल्लाप्पा शिरकोला एम के हुबळी, 5)संतोष सोमय्या हीरेमठ पारीश्वाड, 6)महंमद हनीफ कासिमसाब बसरीकट्टी पारीश्वाड, 7) सिकंदर बाबूसाब दस्तीकोप हिरेहट्टीहोळी, 8)मल्लिकार्जुन बसाप्पा सामानावर एम के हुबळी, अशी अटक केलेल्या आठजणांची नावे असून त्याच्यावर खानापूर पोलीस स्थानकात अपराध संख्या 64/2023 कलम 87 कर्नाटक पोलीस जुगार कायदा 2021 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना खानापूर न्यायालयात हजर केले आहे,