
असोगा हे गांव प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असुन येथे पर्यटक व भावीकांची कायमस्वरूपी गर्दी असते त्यासाठी भाजपाचे खानापूरातील पदाधिकाऱ्यांना घेऊन लवकरच बेंगलोर येथे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांची भेट घेऊन असोगा मलप्रभा नदिच्या तीरावर घाट बांधण्याची योजना, व 10 हजार चौ फुट मंगल कार्यालय बांधण्याची योजना तसेच पर्यटक व भाविकांना रहाण्यासाठी वसतीगृह बांधण्याचा आराखडा मंजूर करून देतो असे जाहीर आश्वासन माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी असोगा येथील श्री रामलींगेश्वर मंदिर व रवळनाथ मंदिराचे जीर्णोद्धार व उदघाटन प्रसंगी काढले यावेळी त्यांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्याचे पूजन करण्यात आले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलींग देव मंदिर ट्रस्टचे चेअरमन जयवंत गोविंद पाटील होते
यावेळी रामलींगेश्वर मंदिराचे उदघाटन भाजपाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव हलगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले की असोगा तीर्थ क्षेत्र व रामलींगेश्वर मंदिर हे अनादिकालापासून प्रसिद्ध असून सर्वानी देवावर मनापासून विश्वास व श्रध्दा ठेवली तर सर्व गोष्टींचे निराकरण निश्चितच होते तेव्हा सर्वानी मनापासून देवाची भक्ती करण्याचें उपस्थितांना अवाहन केले, खानापूर तालूक्यातुन पहिला जज्ज होण्याचा मान असोगा गावाला मिळाला असल्याचे सांगून त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आसोगा गावच्या रहिवासी व रायचूर येथे जज्ज म्हणून कार्यरत असलेल्या जज्ज सौ दिपा उत्तम पाटील यांचे अभिनंदन केले,

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी बोलताना सांगितले की आसोगा येथील घाट बांधकाम, मंगल कार्यालय, व प्रवासी वस्तू गृह माजी एमएलसी मंहातेश कवटगीमठ यांच्याकडे आपण व भाजपाचे पदाधिकारी पाठपुरावा करून त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व योजना मंजूर करून आणण्याची जबाबदारी आमची असल्याचे सांगितले,

यावेळी प्रमुख वक्ते भाजपाचे तालूका अध्यक्ष संजय कुबल, भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांची देव, देश,आणी हिंदूत्व व व्यसनाधीनता याच्यावर मंत्र मुग्ध करणारी भाषणे झाली, सुत्र संचालन एडवोकेट चेतन मणेरीकर व संदिप पाटील यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला उपस्थित होत्या शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली,
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देवुन फेटा बांधून सत्कार करण्यात आला, यावेळी डोंगरगाव मठाचे महाराज भयंकरनाथजी, भाजपाचे जेष्ठ नेते बाबुराव देसाई, कर्नाटक वननिगमचे संचालक सुरेश देसाई, भाजपा महिला राज्यकार्यकारीनी सदस्य सौ धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, भाजपाचे सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी, माजी ता पं सदस्य अशोक देसाई, संघाचे जेष्ठ नेते सदानंद कपिलेश्वरी, एडवोकेट ईश्वर घाडी, गजानन देसाई, भाजपाचे राजेंद्र रायका, कीरण यळूरकर, ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले व सतीश पाटील कौंदल, परशराम रवळु पाटील, सोमान्ना मोरे, सुरेश सुळकर, संभाजी पाटील, नामदेव पाटील, विठ्ठल मणतुर्गेकर, मोहण नंदगडकर, शुभम पाटील, वीरेंद्र मिसाळ, गावातील पंचकमीटी व ग्रामस्थ उपस्थित होते,
