खानापूर तालुक्यातील जांबोटी भागात असलेल्या गोल्याळी गावची बस सेवा कोरोना काळापासून बंद करण्यात आली असून ती पूर्वीसारखीच परत सुरू करण्यात यावीत म्हणून भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली गोल्याळी ग्रांम पंचायतीच्या वतीने लीहण्यात आलेले निवेदन ग्रां पं चेअरमन पांडुरंग गुरव आणि ग्रामस्थांनी के एस आर टी सी बेळगाव डेपोचे डीटीओ श्री लमाणी साहेब यांची आज भेट घेऊन निवेदन सादर केले, यावेळी पंडीत ओगले यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील यांना फोन लावुन सदर बस अधिकारी कडे बोलण्यास फोन दिला असता संजय पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना बस लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले, असता दोन तीन दिवसात बसफेरी पूर्वीप्रमाणे सुरू करतो असी ग्वाही संबधित अधिकारीनी दिली,
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गोल्याळी गावातील व परिसरातील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी बेळगावला येत जात असतात कोरोनापुर्वी बसच्या पाच फेरी होत होत्या पण कोरोना सुरू झाल्यानंतर त्या बस फेरी बंद करण्यात आल्या व त्यानंतर आजपर्यंत फक्त सकाळी आणि संध्याकाळी बसच्या दोनच फेरी होत असल्याने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे,
सध्या विद्यार्थी बाकनुर गावापर्यंत बसने येत असून तेथून पुढे सात किलोमीटर गोल्याळी गावाला पायी चालत ये जा करत आहेत त्यामुळे त्यांचे हे त्रास व शैक्षणिक नूकसान वाचविण्यासाठी पूर्वी पूर्वीप्रमाणेच बस फेरी वाढविण्यात येऊन सकाळी 7-00 वाजता व 10-30 वाजता व दुपारी 1-30 वाजता सायंकाळी 4:30 व 7-30 याप्रमाणे बस गाड्या सोडण्यात याव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजपा युवा नेते पंडित ओगले ग्रामपंचायत चेअरमन पांडुरंग गुरव, मारुती हळब, चाळोबा हळब, ज्ञानेश्वर कुलम, विठ्ठल गवस, पांडुरंग गुरव, सातेरी गावडे, नामदेव गुरव, मारुती गुरव, गुंडू गुरव, ज्ञानेश्वर कुलम, प्रल्हाद गुरव, संजय गुरव रामगुरवाडी, व गोल्याळी ग्रामस्थ उपस्थित होते,