
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन हा बेळगावच्या तुरुंगातून आला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे.
