
आज माचीगड येथे 26 व्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. ग्रंथदिंडीचे उदघाटन माजी आमदार अरविंद पाटील, निरंजन उदयसिंह सरदेसाई सदस्य मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, सुब्रम्हण्य साहित्य अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, संजीव वाटूपकर, पीटर डिसोझा संस्थापक विद्यावर्धिनी प्रतिष्ठान व वास्तूविशारद पुणे, के. पी. पाटील संस्थापक अध्यक्ष श्री साई प्रतिष्ठान, ह. भ. प. मारूती महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

यानंतर
थोर साहित्यिक आणि विचारवंत डॉ.
श्रीपाल
सबनीस
यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाला सुरुवात झाली, प्रा. राजेंद्र यांचे व्याख्यान, कवी संमेलन व प्रेमानंद पाटील यांचे जादूचे प्रयोग असे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले
यावेळी आपल्या अध्यक्षीय अभिभाषणात बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले की सीमा भागातील जनता मोठ्या आशेने महाराष्ट्रात येण्यासाठी मोठ्या आशेने महाराष्ट्राकडे मोठ्या आशेने चौकटीत वाट बघत आहे सीमा भागातील शेतकरी गरिबीत असला तरी संस्कृतीने आणि परंपरेने फार श्रीमंत आहे येथील जनता नाटकावर व साहित्यावर प्रेम करणारी आहे वारकऱ्यावर प्रेम करणारी आहे वारकऱ्यांचा समृद्धीचा वारसा येथील जनतेला लाभला आहे दिवसभर कष्ट करून रात्री संस्कृतीची देवाणघेवाण होत असते एक गुराखी गावची सर्व जनावरे सांभाळत असतो हे सर्व जगानं घेण्यासारखं आहे,
यावेळी सुब्रमण्यम साहित्य अकादमी चे अध्यक्ष बाबुराव पाटील, भाजपाचे नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबरराव पाटील, संभाजीराव देसाई, मुरलीधर पाटील, धनश्री सरदेसाई, प्रमोद कोचेरी, नारायण मोरे, पप्पू पाटील, सुत्रसंचालक निवेदक संजीव गीरी, आदि मान्यवर मंडळी व विविध साहित्य क्षेत्रातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते,



