
खानापूर तालुक्यातील लालवाडी गावात शनिवार दि 31 डिसेंबर रोजी गावात मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली,

पारायण सोहळा ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, योगेश पाटील, यांनी पारायण स्थळी भेट देवुन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी पारायण सोहळा कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले,
