आज सायंकाळी 7 वा जांबोटी क्रॉस खानापूर येथे चालत जाणाऱ्या 70 वर्षीय वृध्दाला मोटर सायकल स्वाराने ठोकरल्याने एका पायाचे गुडघ्याच्या खालील मांस चीरले आसून पायाचे हाड मोडले आहे,
मांस चीरल्याने हाड दिसत होते, सदर वृध्द कीरहलशी गावचे असुन त्यांचे नाव महादेव सनदी असुन त्यांना जांबोटी क्रॉस वर थांबलेले टायगर ग्रुपचे कार्यक्रते सुरेश करडी व ईतर नागरीकांनी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले
असता तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून नातेवाईकांना पुढील उपचारासाठी बेळगावला घेऊन जाण्याचे सांगितले असता त्यांना बेळगाव येथील के एल ई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे समजते सदर गुन्ह्याची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाल्याचे समजते सदर दुचाकी स्वार लालवाडी गावचे असल्याचे समजते