श्री मलप्रभा नदीच्या पात्रात खानापूर शहरातील घाण पाणी सोडण्यात येते ते बंद करण्यात यावेत या मथळ्याखाली काल “आपलं खानापूर” या न्यूज पोर्टल वरती व “आपलं खानापूर” फेसबुक पेज वर बातमी घालण्यात आली होती, त्याची दखल ताबडतोब जिल्हाधिकारी बेळगाव यांनी घेतली असुन आज बेळगाव पोलुशन POLUTION बोर्डाचे अधिकारी जगदीश साहेब व त्यांचे सहकारी यांना आज खानापूर येथे पहाणी करण्यासाठी पाठविले होते, यावेळी नगर पंचायतचे चीफ ऑफीसर बाबासाहेब माने, व ईतर अधिकारी वर्ग उपस्थित होता, यावेळी नगरपंचायत चे मुख्याधिकारी बाबासाहेब माने यांनी आपलं खानापूर व POLUTION बोर्डाचे अधिकारी जगदीश साहेब यांना सांगीतले की KUWS कर्नाटक अर्बन वाटर सप्लाय खात्याकडून 6 कोटी रूपये मंजूर झाले असुन खानापूर शहरातील सर्व घाण पाणी एका जागेला गोळा करून तेथुन एक मशीन द्वारे एका शेतातील जागेवर जमा करून त्या ठिकाणी पाणी फिल्टर करून फिल्टर झालेल पाणी शेतकरी बांधवांना पिकासाठी वापरण्यास देणार असल्याचे सांगून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असुन यानंतर श्री मलप्रभा नदि प्रदुषीत होणार नसल्याचे सांगितले व कुपटगीरी, जळगे, करंबळ, यडोगा व ईतर सर्व गावच्या लोकांना त्रास होणार नसल्याचे सांगितले